वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

निर्यात संवर्धन परीषदा

Posted On: 23 SEP 2020 6:49PM by PIB Mumbai

 

निर्यात संवर्धन परीषद(एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिल) ही निर्यातदारांची परीषद असून निर्यात वृध्दी हा तिचा हेतू आहे. ही परिषद  सोसायटी नोंदणी कायदा आणि कंपनी कायद्याअंतर्गत वर्गीकृत(तयार)केलेली असुन परराष्ट्र व्यापार धोरणातील,अँपेंन्डीक्स 2T  (फॉरेन ट्रेडपाँलिसी )त दिल्याप्रमाणे एखादे विशेष उत्पादन/प्रकल्प/सेवा यांची वृध्दी(संवर्धन)करणे,ही या परीषदेची जबाबदारी आहे. सोबतच्या परीशिष्टात  वाणिज्य विभागाशी संलग्नित 14 अशा निर्यात वृध्दी परीषदांची यादी जोडलेली आहे.निर्यातदारांसोबत परस्पर संवाद आणि परीषदेची कामगिरी सुरळीतपणे सुरू रहावी  यासाठी नियमितपणे संयुक्त बैठका आयोजित केल्या जातात.परीषदेच्या खात्याचे  लेखापरीक्षण करणे अनिवार्य आहे.परीषदेच्या कामगिरीच्या  अहवालाचा आढावाप्रत्येक वर्षी संसदेत  सादर केला जातो.

 

परीशिष्ट

वाणिज्य विभागाशी संलग्न निर्यात संवर्धन परीषदांची यादी

पायाभूत(बुनियादी) रसायने, औषधे, प्रसाधन सामुग्री निर्यात संवर्धन परीषद, (केमेक्सिल), मुंबई

काजू निर्यात संवर्धन परीषद,(CEPCI)कोल्लम,केरळ

रसायने आणि संबंधित उत्पादन निर्यात संवर्धन परीषद ,कँपेक्सिल (Capexil) कोलकाता

चर्म निर्यात परीषद ,सीएलई ,चेन्नई

इंजिनिअरिंग निर्यात संवर्धन परीषद, ईईपीसी कोलकाता

एक्स्पोर्ट प्रमोशन काऊंसिल फॉर ईओयू अँड एसईझेड (EPCES) ईपीसीईएस,नवीदिल्ली

जेम अँड ज्वेलरी निर्यात संवर्धन परीषद,(GJEPC), मुंबई

ईंडियन आँईल सीड्स अँन्ड प्रोड्यूस एक्स्पोर्ट प्रमोशन काऊंसिल, (IOPEPC) मुंबई

फार्मास्यूटीकल एक्स्पोर्ट प्रमोशन काऊंसिल,फार्मेक्सिल, हैद्राबाद

प्लास्टिक निर्यात संवर्धन परीषद,(Plexconcil), मुंबई

प्रोजेक्ट एक्स्पोर्ट  प्रमोशन परीषद,(PEPC) नवी दिल्ली

सेवा निर्यात संवर्धन परीषद,(SEPC) नवी दिल्ली

शेलँक आणि वन उपज निर्यात संवर्धन परीषद,शेफेक्सिल, (Shefedil) कोलकाता

स्पोर्ट्स गुड्स एक्स्पोर्ट प्रमोशन काऊंसिल,(SGEPC), नवी दिल्ली

ही माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री. पियुष गोयल यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे.

***

B.Gokhale/S.Patgaonkar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1658271) Visitor Counter : 181