ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

आयात केल्या जाणाऱ्या खेळण्यांसाठी गुणवत्ता निकष

Posted On: 23 SEP 2020 3:56PM by PIB Mumbai

 

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन  विभागाने (डीपीआयआयटी) खेळण्यांबाबत दर्जा नियंत्रण आदेश (क्यूसीओ) दिनांक 25.02.2020 रोजी अधिसूचित केले होते आणि  त्याची अंमलबजावणी तारीख 1.9.2020 आहे. मात्र उद्योग संघटनांच्या विनंतीनुसार अंमलबजावणीची तारीख 01.01.2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

या आदेशानुसार  खेळण्यांच्या सुरक्षेसाठी संबंधित भारतीय मानकांचे अनुपालन करणे आणि बीआयएसच्या परवान्याअंतर्गत भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) मानक मार्क ठेवणे खेळण्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी)  खेळण्यांची  यादृच्छिक नमुना चाचणी करण्याबाबत दिनांक 02.12.2019  रोजी  अधिसूचना क्रमांक 33/2015-2020 जारी केली असून खेळण्यांच्या आयातीबाबत यशस्वी मंजुरी अनिवार्य आहे.

परदेशी परवानाधारकांच्या वस्तूंचे बाजारातील नमुने काढण्यासाठी बंदरांच्या अथवा विमानतळाच्या प्रवेशद्वारावर अधिकारी तैनात केले  आहेत आणि या संदर्भातील मानक परिचालन नियमावली सीमाशुल्क विभागाबरोबर  सामायिक केली  आहे.

केंद्रीय ग्राहक व्यवहार , अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री  रावसाहेब  दानवे यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1658169) Visitor Counter : 74