शिक्षण मंत्रालय

‘शिक्षक पर्व’ उपक्रमाअंतर्गत शिक्षण

प्रविष्टि तिथि: 22 SEP 2020 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2020

 

शिक्षण मंत्रालयाच्यावतीने नव्याने जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी दि. 8 ते 25 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये विविध राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करून ‘शिक्षक पर्व’ साजरे करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. 21 सप्टेंबर, 2020 रोजी ‘‘उच्च शिक्षणामध्ये नियामक सुधारणा’’ याविषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य आणि पंजाब मध्यवर्ती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आर.पी. तिवारी, राष्ट्रीय मान्यताप्राप्त मंडळाचे अध्यक्ष प्रा. के.के. अग्रवाल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नितीन आर. करमाळकर, तेजपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.के. जैन यांना वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या वेबिनारच्या नियंत्रक म्हणून भारतीय विद्यापीठ संघटनेच्या महासचिवा डॉ .(श्रीमती) पंकज मित्तल यांनी काम केले. 

 

* * *

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1657949) आगंतुक पटल : 154
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi