गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
परवडणारी भाड्याच्या घरांची संकुले (एआरएचसीएस), प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (पीएमएवाय-यू)अंतर्गत उप-योजनेची अंमलबजावणी सार्वजनिक / खाजगी संस्थांकडून केली जाणार
प्रविष्टि तिथि:
22 SEP 2020 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2020
प्रधानमंत्री आवास योजना - शहरी (पीएमएवाय-यू) अंतर्गत परवडणारी भाड्याच्या घरांची संकुले (एआरएचसी),ही उप-योजना सार्वजनिक / खाजगी संस्थांद्वारे विद्यमान शासकीय अनुदानीत रिक्त संकुलांना एआरएचसीमध्ये रूपांतरित करून किंवा त्यांच्या स्वतःच्या उपलब्ध रिकाम्या जागेवर बांधकाम, परिचालन आणि देखरेखीद्वारे राबवली जाईल.
शहरी स्थलांतरित / गरीब लोकांसाठी परवडणारी भाड्याच्या घरांची शाश्वत परिसंस्था तयार करण्यासाठी “आत्मनिर्भर भारत” च्या संकल्पनेच्या धर्तीवर ही योजना तयार केली आहे. धोरणात्मक प्रोत्साहनानुसार सार्वजनिक / खाजगी संस्थांसाठी अनुकूल परिसंस्था तयार करण्याची ही कल्पना असून परवडणारी भाड्याची घरे तयार करण्यासाठी गुंतवणूकीचा फायदा घेतील.
या योजनेअंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारीला चालना देण्यासाठी, केंद्र सरकार आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी खालीलप्रमाणे प्रोत्साहन / लाभ प्रस्तावित केले आहेत:
- आयकर कायदा 1961;च्या कलम -80-आयबीए अंतर्गत ‘परवडणारी घरबांधणी ’ प्रमाणेच एआरएचसीच्या परिचालनातून मिळणार्या कोणत्याही नफ्यावर आणि लाभावर प्राप्तिकरात सूट;
- 28 जून 2017 च्या अधिसूचना क्र. 12- केंद्रीय कर (दर) नुसार निवासी जागेच्या भाड्याच्या सेवांच्या बरोबरीने एआरएचसीच्या परिचालनातून मिळालेल्या कोणत्याही नफ्यावर आणि लाभावर जीएसटीची सूट;
- व्यावसायिक बँकांकडून गृहनिर्माण वित्तीय कंपन्या (एचएफसी) आणि प्राधान्य क्षेत्र कर्जपुरवठादारांकडून (पीएसएल) सवलतीच्या माध्यमातून कमी व्याज दराने प्रकल्प वित्त / कर्जपुरवठा ;
- आवश्यक असल्यास मोकळ्या जमिनीवरील घरांसाठी “वापरण्यास परवानगी” असा बदल करण्याची तरतूद;
- 50% अतिरिक्त चटई क्षेत्र गुणोत्तर (एफएआर) / फ्लोर स्पेस इंडेक्स (एफएसआय) विनामूल्य;
- 30 दिवसांच्या आत रचना / रेखांकने आणि इतर वैधानिक मंजूरीसाठी सिंगल विंडो मंजूरी;
- प्रकल्पाच्या जागेपर्यंत रस्ता, स्वच्छता सेवा, पाणी, सांडपाणी / मलनिस्सारण, गटारे, वीज इत्यादी आवश्यक पायाभूत सुविधा कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय;
- पाणीपुरवठा, वीज, घर / मालमत्ता कर, नाले/सेप्टेंज शुल्क इत्यादी महानगरपालिका सेवा निवासी प्रकल्पांच्या बरोबरीने भाड्याच्या घरांसाठी आकारल्या जातील; आणि
- तंत्रज्ञान अभिनवता अनुदान (टीआयजी) च्या स्वरुपात अतिरिक्त अनुदान गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने (एमओएचयूए) प्रस्तावित केले असून अभिनव, शाश्वत , हरित व आपत्ती-रोधक तंत्रज्ञानाचा वापर तसेच कमी खर्चिक , वेगवान आणि दर्जेदार बांधकामांसाठी साहित्याचा वापर करण्यासाठी ही तरतूद केली आहे. योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक घरासाठी (एक बेडरूम) 60,000/- रुपये ,(डबल बेडरूम)1,00,000 रुपये आणि प्रत्येक डॉर्मिटरी बेडसाठी 20,000/-रुपये तंत्रज्ञान अभिनवता अनुदान (टीआयजी) दिले जाईल .
एआरएचसीसाठी लाभार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (ईडब्ल्यूएस) / अल्प उत्पन्न गट (एलआयजी) मधील शहरी स्थलांतरित किंवा गरीब असतील. त्यामध्ये कामगार, शहरी गरीब (रस्त्यावरचे विक्रेते, रिक्षा चालक, इतर सेवा पुरवठादार इ.), औद्योगिक कामगार आणि बाजार / व्यापार संघटना, शैक्षणिक / आरोग्य संस्था, आतिथ्य सेवा , दीर्घकालीन पर्यटक / अभ्यागत, विद्यार्थी किंवा इतर कोणत्याही व्यक्तींसह काम करणारे स्थलांतरीत यांचा समावेश आहे.
गृहनिर्माण आणि शहरी कामकाज राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) हरदीपसिंग पुरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
M.Iyengar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1657876)
आगंतुक पटल : 149