संरक्षण मंत्रालय

‘मेक इन इंडिया’ योजना

Posted On: 21 SEP 2020 6:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर  2020

सशस्त्र दलाची आवश्यकता लक्षात घेवून स्वदेशी संरक्षण उपकरणे, साधन सामुग्री वापरण्याचे लक्ष्य संरक्षण मंत्रालयाने निश्चित केले आहे. संरक्षण विभागाला लागणाऱ्या विविध उपकरणांची तसेच साधनांची खरेदी ही देशांतर्गत त्याचबरोबर परदेशातल्या विक्रेत्यांकडूनही केली जाते. मात्र ही खरेदी करताना सर्व प्रकारच्या धोक्यांचा विचार तसेच उपकरणे हाताळताना येत असलेली आव्हाने, तंत्रज्ञानात होणारा बदल तसेच सुरक्षा व्यवस्थेतील आव्हाने आणि सशस्त्र दलाला कायम सज्ज राहण्याची असलेली गरज, लक्षात घेतली जाते.

संरक्षण क्षेत्रामध्ये ‘मेक इन इंडिया‘ धोरण राबविताना विविध उपक्रमांचा विचार करण्यात आला आहे. देशामध्येच काही शस्त्रांची डिझाइन तयार करणे, संरक्षण वस्तूंचा विकास आणि उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचबरोबर संरक्षण खरेदी प्रक्रिया (डीपीपी),अनुसार ‘बाय (इंडियन-आयडीडीएम)‘, ‘स्वदेशी खरेदी‘, ‘भारतीय वस्तू खरेदी करणे आणि तयार करणे, ‘मेक’, ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मॉडेल’ पेक्षा ‘स्वतः बनविणे’ या श्रेणीला प्राधान्य दिले आहे. आणि भांडवल संपादनासाठी वैश्विक श्रेणीला प्राधान्य देण्याचे धोरण गेल्या सहा आर्थिक वर्षांमध्ये म्हणजेच सन 2014-15 ते 2019-20 (डिसेंबर 2019 पर्यंत) स्वीकारले आहे. तसेच सरकारने ‘एओएन’ म्हणजे ‘गरजेसाठी स्वीकार’ म्हणून  अंदाजे 4,15,006 कोटींची 226 प्रकरणे मंजूर केली आहेत. यामध्ये विविध प्रकारानुसार भांडवल संपादन करण्यात आले असून संरक्षण खरेदी प्रक्रियेनुसार देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

यामध्ये संरक्षणासाठी अत्यंत महत्वाची असलेल्या साधन सामुग्रीचा समावेश आहे. अगदी 155 मिमी आर्टिलरी गन - ‘धनुष’, लढाऊ विमान ‘तेजस’, ‘आकाश’, जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, हल्ला करणारी पाणबुडी, ‘आयएनएस कलवरी’, आयएनएस चन्नई’, यांच्यासह अनेक महत्वाची संरक्षण शस्त्रास्त्रे, उपकरणे देशांतर्गत तयार करण्यात आली आहेत. ही सर्व सामुग्री सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेतून प्रोत्साहन घेवून तयार केली आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये- सन 2017-18 ते 2019-2020  संरक्षण उपकरणांच्या केलेल्या खरेदीचा तपशील येथे देण्यात आला आहे.

अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेमध्ये शरमिष्ठा सेठीन यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये दिली.

 

 

M.Iyengar/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1657407) Visitor Counter : 153


Read this release in: Telugu , English , Bengali , Tamil