गृह मंत्रालय

तबलीगी जमात व्यक्तींची अटक

Posted On: 21 SEP 2020 5:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर  2020

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 संक्रमण उद्रेकाच्या परिस्थितीत विविध प्राधिकरणांनी जारी केलेल्या नियमावली/आदेशानंतरही योग्य अंतराचे पालन न करता, मास्क आणि सॅनिटायझर्सचा वापर न करता बंदिस्त जागेत मोठ्या संख्येने लोक एकत्र जमले. यामुळे मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग देखील पसरला.

दिल्ली पोलिसांनी 29.03.2020 पासून तबलीगी जमातच्या 2361 व्यक्तींना निझामुद्दीन मुख्यालयातून हलवले आहे.  

दिल्ली पोलिसांनी जमातच्या 233 जणांना अटक केली आहे. तथापी, जमात प्रमुख मौलाना मोहम्मद सईदविषयी चौकशी सुरु आहे. 

केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

M.Iyengar/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1657361) Visitor Counter : 69


Read this release in: English , Urdu , Punjabi , Tamil