आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

संक्रमण आजाराशी संबंधित मानसिक आरोग्य प्रकरणात वाढ

Posted On: 20 SEP 2020 10:27PM by PIB Mumbai

 

कोविड-19 परिस्थितीमध्ये मानसिक आधार देण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. 

मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडून सल्ल्यासाठी मानसिक आधारासाठी 24/7 हेल्पलाईन सुरु केली आहे. बालके, प्रौढ, ज्येष्ठ नागरीक, महिला आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा आहे. वेळोवेळी आरोग्यसेवा व्यवस्थापनाविषयी नियमावली/सूचना जारी केली जाते. दृकश्राव्य माध्यमांतून वेळोवेळी तणावमुक्तीसंबंधी मार्गदर्शन केले जाते.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स, बेंगळुरुने कोविड-19 परिस्थितीसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या  https://www.mohfw.gov.in/  संकेतस्थळावर या मार्गदर्शक सूचना उपलब्ध आहेत.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

****

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1657101) Visitor Counter : 210


Read this release in: English , Manipuri , Telugu