ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
एनसीडीआरसीकडून तहकुब केल्या जाणाऱ्या ग्राहक तक्रारी
Posted On:
20 SEP 2020 7:15PM by PIB Mumbai
ग्राहक संरक्षण कायदा, 2019 आणि ग्राहक संरक्षण (ग्राहक आयोग प्रक्रिया) नियमन, 2020 मध्ये तक्रारींचे जलद निवारण करण्याची तरतुद आहे. तक्रारींचा वेळेवर निपटारा सुनिश्चित करण्यासाठी अशी तरतूद करण्यात आली आहे की, अपवादात्मक परिस्थितीत प्रकरण तहकुब केले जाईल आणि त्याबाबतच्या कारणाची लिखीत नोंद केली जाईल. तहकुबीसाठी एखादे प्रकरण आले तर, ग्राहक आयोगाला योग्य कारण दाखवल्यास, तहकुब होऊ शकते.
गेल्या तीन वर्षात राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे दाखल तक्रारी आणि निवारण केलेल्या तक्रारींचा तपशील पुढीलप्रमाणे:
वर्ष
|
दाखल तक्रारी
|
निवारण केलेल्या तक्रारी
|
2017
|
3907
|
1303
|
2018
|
2839
|
1405
|
2019
|
2459
|
1435
|
उपलब्ध माहितीनुसार, सध्या राष्ट्रीय आयोग, राज्य आणि जिल्हा आयोगाकडे 534 अध्यक्ष, 1140 सदस्य आहेत.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
****
B.Gokhale/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1657030)
Visitor Counter : 172