अर्थ मंत्रालय

जीएसटी महसूल तूट भरून काढण्यासाठी कर्जाऊ रक्कम

Posted On: 20 SEP 2020 4:05PM by PIB Mumbai

 

वस्तू आणि सेवा कर (राज्यांच्या नुकसान भरपाई) कायदा, 2017 अधिनियम 7,8 आणि 10 कलमांमध्ये असलेल्या तरतुदीनुसार जीएसटी नुकसान भरपाई आणि भविष्यामध्ये महसुलामधील तूट भरून काढण्यासाठी कृती धोरण निश्चितीसाठी जीएसटी परिषदेच्या दि. 27.08.2020 रोजी झालेल्या 41 व्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. यानुसार भारताच्या अॅटनी जर्नल यांनी चालू आर्थिक वर्षामधे आलेली महसूल तूट भरून काढण्यासाठी राज्यांना दोन पर्याय दिलेत. अशी माहिती केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज राज्यसभेमध्ये एका प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये दिली.

तथापि, काही राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी बाजारपेठेतून कर्जाऊ रक्कम घेण्याचा पर्याय केंद्र सरकारला सुचविला असून त्यामधून जीएसटी महसुलातील तूट भरून काढून नुकसान भरपाई द्यावी, असे सुचविले आहे. यासंदर्भात ज्या राज्यांनी अद्याप कोणताही पर्याय दिलेला नाही, अशा राज्यांनीही आपला पर्याय द्यावा, यासाठी केंद्र सरकार कार्यरत आहे, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.

कर्ज घेण्यासाठी असलेल्या दोन पर्यायांचा तपशील व्यय विभागाच्यावतीने राज्यांना पाठविण्यात आल्याची माहितीही अनुराग ठाकूर यांनी यावेळी दिली.

---

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1656948) Visitor Counter : 192