पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

इथेनॉलचे उत्पादन

प्रविष्टि तिथि: 19 SEP 2020 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2020

 

इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या उत्पादनासाठी तेल विपणन कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांत केलेल्या इथेनॉल खरेदीची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:

इथेनॉल पुरवठा वर्ष (ESY)*

परीमाण ( कोटी लिटर मध्‍ये)

2016-17

66.5

2017-18

150.5

2018-19

188.6

*ESY – Ethanol Supply Year (1st Dec to 30th Nov)

1 डिसेंबर ते 30 नोव्हेंबर असे एक इथेनॉल पुरवठा वर्ष मानले जाते. त्यानुसार, 2016-17 या वर्षात 66.5 कोटी लिटर इथेनॉल खरेदी करण्यात आले. त्यानंतरच्या वर्षात म्हणजे 2017-18 मध्ये 150.5 कोटी लिटर तर 2018-19 या वर्षात 188.6 कोटी लिटर इथेनॉल खरेदी करण्यात आले.

इथेनॉल उत्पादकांकडे नोंदविलेल्या मागणीनुसार  तेल विपणन कंपन्यांनी विद्यमान आर्थिक वर्षात 192.87 कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे करार केलेले आहेत.

राष्ट्रीय जैवइंधन धोरण- 2018 नुसार, 2030 सालापर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे दर्शक ध्येय गाठण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इथेनॉलचे पेट्रोलमध्ये करण्यात येणारे मिश्रण इथेनॉलच्या उपलब्धतेवर अवलंबून असते आणि इथेनॉलचे उत्पादन ऊस तसेच माणसांना खाण्यासाठी अन्न म्हणून निरुपयोगी ठरलेले, खराब झालेले धान्य इत्यादी कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर आणि पिण्यासाठी वापरले जाणारे अल्कोहोल, औषध निर्मिती, रसायने, खनिज तेल इत्यादी क्षेत्रांसाठी लागणाऱ्या इथेनॉलच्या मागणीवर देखील  अवलंबून असते.  

ऊस किंवा काकवी या दोन्हीपासून निर्माण करण्यात आलेले इथेनॉल एकच असते आणि दोन्ही सारखेच उपयुक्त असते अशी माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिली आहे.

प्रत्यक्ष ऊसाचा रस, साखर किंवा साखरेच्या द्रवापासून इथेनॉल उत्पादन करणाऱ्या प्रमुख कारखान्यांची यादी परिशिष्टात दिली आहे.

पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यासाठी खालील महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत:

उसाचा रस किंवा साखर अथवा साखरेचे द्रावण यापासून इथेनॉल निर्मिती करायला प्रोत्साहन देणे

विविध अन्नसाठ्यांपासून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलची कारखानाबाह्य किंमत निश्चित करणे.

इथेनॉल निर्मिती कारखान्याला दिल्या जाणाऱ्या कर्जावर वाढीव अनुदान देणे.

इथेनॉलमिश्रित पेट्रोल कार्यक्रमासाठी सेवनास अयोग्य इथेनॉलच्या मुक्त वाहतुकीसाठी उद्योग (विकास आणि नियमन) कायदा 1951 मध्ये सुधारणा करणे.

इथेनॉलमिश्रित पेट्रोल कार्यक्रमासाठी वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलवरील वस्तू आणि सेवा कर 18 टक्क्यांवरून कमी करून ५ टक्के करणे.

1 एप्रिल 2019 इथेनॉलमिश्रित पेट्रोल कार्यक्रमाचा विस्तार अंदमान,निकोबार आणि लक्षद्विप हे केंद्रशासित प्रदेश वगळता संपूर्ण देशात पासून करण्यासाठी प्रयत्न करणे.

तेल विपणन कंपन्यांकडे असलेला इथेनॉल साठा वाढविणे.

“इथेनॉलमिश्रित पेट्रोल कार्यक्रमाअंतर्गत दीर्घकालीन इथेनॉल खरेदी धोरण” तयार करणे"

केंद्रीय खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी शनिवारी लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.


* * *

B.Gokhale/S.Chitnis/D.Rane

 

ANNEXURE

List of major Sugar Mills producing ethanol from Sugarcane Juice / Sugar / Sugar syrup

S. NO.

NAME

1

CORE GREEN SUGAR & FUELS PVT LTD

2

DHAMPUR SUGAR MILLS LIMITED

3

EID PARRY INDIA LIMITED

4

GODAVARI BIOREFINERIES LTD.

5

JAKRAYA SUGAR LTD.

6

JAMKHANDI SUGARS LTD.

7

LOKNETE SUNDERRAOJI SOLANKE S S K LTD.

8

RANA SUGARS LTD (DISTILLERY DIVISION)

9

SHAMANUR SUGARS LIMITED

10

SHARAYU AGRO INDUSTRIES LTD

11

SHREE RENUKA SUGARS LTD

12

SHREE TATYASAHEB KORE WARANA SAHAKARI SAKHAR KARKHANA LIMITED

13

SHREE SAIPRIYA SUGARS LIMITED

14

NIRANI SUGARS LTD (DISTILLERY DIVISION)

15

UTOPIAN SUGARS LTD.

16

YEDESHWARI AGRO PRODUCTS LTD.

17

KPR SUGAR MILL LIMITED

                                                                       ******

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1656717) आगंतुक पटल : 2156
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Manipuri , Punjabi , Tamil