पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
तेलाच्या आयातीत घट
Posted On:
19 SEP 2020 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2020
सन 2019-20 मध्ये पेट्रोलियम पदार्थांचा वापर 213.7 एमएमटी होता आणि तेल आणि तेलाच्या समकक्ष वायूच्या आयात अवलंबित्वाची टक्केवारी 77.9% होती.
सध्या केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क आकारते, तर राज्य सरकार व्हॅट / विक्री कर आकारते. उत्पादन शुल्क विशिष्ट आधारावर (प्रतिलिटर निश्चित रक्कम) आकारले जाते आणि व्हॅट / विक्री कर (बहुतांश राज्यांद्वारे) वस्तूच्या अंदाजे मूल्याच्या प्रमाणात आकारला जातो. बिगर-जीएसटी वस्तूंवरील उत्पादन शुल्क आणि जीएसटीअंतर्गत असणाऱ्या उत्पादनांचे दर यांचा तपशील पुढे जोडला आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने आंतर-रणनीती आखली आहे ज्यात प्रामुख्याने तेल आणि वायूचे देशांतर्गत उत्पादन वाढवणे आणि कच्च्या तेलाची आयात कमी करण्याच्या उद्देशाने जैव-इंधन / पर्यायी इंधनांना प्रोत्साहन देणे यासह सरकारनेही अनेक उपक्रम घेतले आहेत. यामध्ये इथॅनॉल ब्लेंडिंग इन पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रम आणि डिझेलमध्ये बायो-डिझेल ब्लेंडिंगद्वारे इथेनॉल आणि बायो-डिझेल या पर्यायी इंधनांच्या वापराला प्रोत्साहित करणे समाविष्ट आहे. देशातील जैव इंधनांची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने राष्ट्रीय जैव इंधन धोरण 2018 तयार केले आहे. इथेनॉल ब्लेंडिंगवर अधिक भर देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या देशातील 11 राज्यांत बारा टू-जी इथेनॉल संयंत्र स्थापित करत आहेत.
बाजारपेठ वाहतूक इंधन अधिकृत करण्याबाबत 08.11.2019 च्या ठरावानुसार, अधिकृत संस्थांना पारंपारिक इंधनाव्यतिरिक्त कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी), बायो-ईंधन, लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी), इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉईंट्स इत्यादी पैकी किमान एक पर्यायी इंधन त्यांच्या प्रस्तावित किरकोळ दुकानात (आरओ) परिचालनाच्या तीन वर्षांच्या आत विविध वैधानिक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विपणनासाठी सुविधा उभारणे आवश्यक आहे. तसेच, 31.08.2020 पर्यंत, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी देशातील 110 किरकोळ दुकानात इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा आणि 17 किरकोळ दुकानात बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारली आहेत.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
Annexure
- Details of Excise duty on non GST goods
S. No.
|
Commodity
|
Basic Excise Duty
|
Special Additional Excise Duty
|
Road & Infrastructure Cess
|
Total Central Excise Duty
|
1
|
Crude Petroleum Oil
|
Rs 1 per ton excise duty + Cess @20% +
Rs.50/ MT as NCCD
|
--
|
--
|
Rs 1 per tonne excise duty + Cess @20% +
Rs.50/ MT as NCCD
|
2
|
Natural Gas
[other than compressed natural gas]
|
Nil
|
--
|
--
|
Nil
|
3
|
Compressed Natural Gas
|
14%
|
--
|
--
|
14%
|
4
|
Petrol (Unbranded)
|
Rs. 2.98/ltr
|
Rs. 12.00/ltr
|
Rs. 18.00/ltr
|
Rs. 32.98/ltr
|
5
|
High Speed Diesel (Unbranded)
|
Rs. 4.83/ltr
|
Rs.9.00/ltr
|
Rs. 18.00/ltr
|
Rs. 31.83/ltr
|
6
|
ATF
|
11%
[2% for RCS flights]
|
--
|
--
|
11%
[2% for RCS flights]
|
NCCD : National Calamity Contingent Duty
RCS: Regional Connectivity Scheme
- Rates of GST on Other petroleum products
Commodity
|
GST
|
LPG
|
Domestic
|
5.00%
|
Non - Domestic
|
18.00%
|
Kerosene
|
PDS
|
5.00%
|
Non PDS
|
18.00%
|
Naphtha
|
Fertilizer
|
18.00%
|
Non- Fertilizer
|
18.00%
|
Bitumen & Asphalt, furnace oil, Lube, Pet coke etc
|
|
18.00%
|
* * *
B.Gokhale//S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1656693)
Visitor Counter : 236