अर्थ मंत्रालय
सीमाशुल्क अंमलबजावणी (व्यापार करारा अंतर्गत मूळ नियमांचे प्रशासन) अधिनियम 2020 ची 21 सप्टेंबर 2020 पासून अंमलबजावणी
Posted On:
18 SEP 2020 7:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2020
सीमाशुल्क (व्यापार करारांतर्गत मूळ नियमांचे प्रशासन) अधिनियम 2020 (CAROTAR, 2020) 21 ऑगस्ट, 2020 रोजी अधिसूचित झाले असून आयातदारांना आणि इतर हितधारकांना नवीन तरतुदींसह परिचित होण्यासाठी देण्यात आलेल्या 30 दिवसाची मुदत पूर्ण झाल्यावर 21 सप्टेंबर 2020 पासून लागू होईल.
देशांतर्गत उद्योगांना एफटीएचा गैरवापरापासून वाचवण्यासाठी सीमाशुल्क (व्यापार करारा अंतर्गत मूळ नियमांचे प्रशासन) अधिनियम 2020 यावर्षीच्या अर्थसंकल्पातील अर्थमंत्र्यांच्या वचनबद्धतेची अंमलबजावणी करते. अर्थमंत्री म्हणाले होते की एफटीए लाभांच्या अयोग्य दाव्यांमुळे देशांतर्गत उद्योगाला धोका निर्माण झाला आहे. अशा आयातीसाठी कठोर तपासणी आवश्यक आहे. या संदर्भात सीमाशुल्क कायदा 1962 मध्ये योग्य तरतुदींचा समावेश केला जात आहे. ”
21 ऑगस्ट 2020 रोजी सीबीआयसी परिपत्रक क्रमांक 38/2020-सीयुएस कॅरोटार, 2020 विविध व्यापार करारा (एफटीए / पीटीए / सीईसीए / सीईपीए) अंतर्गत विहित विद्यमान कार्यान्वयन प्रमाणीकरण प्रक्रियेला पूरक आहेत. आयातदाराला आता माल आयात करण्यापूर्वी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरुन ते निहित मूळ निकषाची पूर्तता करतील. सामान्य मार्गदर्शनासह आयातदारास आवश्यक असलेल्या किमान माहितीची यादी देखील नियमात प्रदान केली आहे. तसेच, आयातदाराला आता बिल ऑफ एंट्रीमध्ये मूळ उत्पत्तीच्या प्रमाणपत्रात उपलब्ध असलेली काही मूळ संबंधित माहिती प्रविष्ट करावी लागेल.
नवीन नियम आयातदाराला मूळ देशाचा योग्यरितीने शोध घेण्यास, सवलतीच्या शुल्काचा योग्य दावा आणि एफटीए अंतर्गत कायदेशीर आयात सुलभतेने करण्यात सीमाशुल्क अधिकार्यांना मदत करतील. त्यामुळे सीबीआयसी वेबिनार आणि इतर माध्यमांद्वारे हितधारकांना नवीन नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सक्रियपणे सहभागी होता येईल.
नवीन नियमांमुळे एफटीए अंतर्गत शुल्क सवलतींचा कोणताही गैरवापर रोखण्यात सीमाशुल्क विभागाला बळ मिळेल.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1656380)
Visitor Counter : 225