गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत कृषी सुधारणांवरील दोन महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती आभार व्यक्त केले
Posted On:
18 SEP 2020 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती, लोकसभेत कृषी सुधारणांवरील दोन महत्त्वपूर्ण विधेयक मंजूर केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. ट्वीट संदेशात ते म्हणाले, देशाची संपत्ती आणि समृद्धी यामध्ये योगदान देणाऱ्या मेहनती शेतकऱ्यांचा देशाला अभिमान आहे. मोदी सरकारच्या रुपाने, प्रथमच केंद्रात असे सरकार आहे, जे शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी दिवस-रात्र मेहनत करत आहे आणि काल लोकसभेत मंजूर झालेले महत्त्वपूर्ण कृषी सुधारणा विधेयक या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, मोदी सरकारच्या या महत्त्वपूर्ण कायद्यामुळे कृषी क्षेत्राचा कायापालट होईल आणि शेतकर्यांची मध्यस्थांच्या तावडीतून सुटका होईल आणि इतर अडथळे दूर होण्यास मदत होईल. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना कृषी उत्पादन विकण्यासाठी नवीन संधी निर्माण होतील, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल.
अमित शाह पुढे म्हणाले, या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडून येईल आणि त्यांना स्वावलंबी बनता येईल. या विधेयकाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याप्रती आभार व्यक्त करतो.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1656370)
Visitor Counter : 144