महिला आणि बालविकास मंत्रालय
महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या प्रमुख कल्याणकारी योजना
Posted On:
17 SEP 2020 11:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2020
महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून राबवण्यात येणाऱ्या प्रमुख योजनांच्या लाभार्थ्यांविषयी राज्यनिहाय माहिती सोबत जोडण्यात आली आहे:-
1. अंगणवाडी सेवा:
एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) ही केंद्रपुरस्कृत योजना आहे. सहा वर्षे वयोगटाखालील बालकांचा सर्वांगीण विकास, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना सहा सेवांचा समावेश असलेले पॅकेज प्रदान केले जाते. (i) पूरक पोषण; (ii) पूर्व-शालेय अनौपचारिक शिक्षण; (iii) पोषण आणि आरोग्य शिक्षण; (iv) लसीकरण; (v) आरोग्य तपासणी; आणि (vi) तळागाळातील अंगणवाडी केंद्रांमार्फत अनुषंगिक सेवा. राज्यनिहाय लाभार्थींचा तपशील परिशिष्ट-A मध्ये पुरवण्यात आला आहे.
2. पोषण अभियान:
मार्च 2018 मध्ये पोषण अभियानाची सुरुवात करण्यात आली. 0-6 वयोगटातील बालकांची, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची पोषण स्थिती सुधारणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
3. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना:
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY), ही केंद्रपुरस्कृत शर्तींवर रोख रक्कम हस्तांतरीत करणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 5,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये प्रदान केले जातात. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत (JSY) पात्र लाभार्थ्यांना उर्वरीत रक्कम प्रदान केली जाते. सरासरी, पात्र महिलेला 6,000 रुपये मिळतात. देशभर दरवर्षी 51.70 लाभार्थी योजनेचा लाभ घेतात. राज्यवार विवरण परिशिष्ट-B मध्ये आहे.
पीएमएमव्हीवाय योजनेची अंमलबजावणी 01.01.2017 पासून केली जाते.
4. किशोरवयीन मुलींसाठी योजना:
या योजनेअंतर्गत 11-14 वयोगटातील मुलींना पुरक पोषण 600 कॅलरीज, 18-20 ग्राम प्रथिने आणि सूक्ष्म पोषक घटक वर्षातून 300 दिवस पुरवले जातात. गेल्या पाच वर्षातील राज्यवार विवरण परिशिष्ट-C मध्ये जोडण्यात आले आहे. ही योजना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवर आहे. राज्य / केंद्रशासित प्रदेशांना दिला जाणारा खर्च सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून केला जातो.
5. बाल संरक्षण योजना:
बाल संरक्षण सेवा (CPS) योजना बाल परिस्थिती (बालकांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम, 2015 (JJ Act) अंतर्गत परिकल्पीत केल्याप्रमाणे कठीण परिस्थितीत मुलांना आधार देते. गेल्या पाच वर्षातील राज्यनिहाय लाभार्थींचे विवरण परिशिष्ट- D मध्ये जोडण्यात आले आहे.
6. राष्ट्रीय सार्वजनिक संगोपन केंद्र योजना:
राष्ट्रीय सार्वजनिक संगोपन केंद्र योजना, ही केंद्रपुरस्कृत योजना राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या माध्यमातून 01.01.2017 पासून राबवली जाते. कार्यरत मातांच्या 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना दिवसभर संगोपन सुविधा पुरवल्या जातात.
7. निर्भया निधी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजना
निर्भया निधी अंतर्गत तीन योजना राबवल्या जातात. (i) वन स्टॉप सेंटर, (ii) महिला हेल्पलाईन, आणि (iii) महिला पोलीस स्वयंसेवक.
8. बेटी बचाओ बेटी पढाओ
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उद्देश 0-6 वयोगटातील कमी होत जाणारे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवणे हा आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि शिक्षण मंत्रालय अशा तीन मंत्रालयाचा संयुक्त प्रकल्प आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांमार्फत जिल्ह्यांना थेट निधी पुरवला जातो. 2016-17 पासून बीबीबीपीच्या जिल्हा खात्यांमध्ये थेट निधी हस्तांतरीत केला जातो.
9. स्वाधार गृह
स्वाधार गृह योजनेतून दुर्दैवी घटनांमधील महिलांचे पुनवर्सन केले जाते, ज्यामुळे त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता येईल. विस्थापीत महिला आणि वयस्कर महिलांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा पुरवली जाते. स्वाधार गृहांचे राज्यनिहाय विवरण परिशिष्ट- H मध्ये दर्शवण्यात आले आहे.
10. उज्ज्वला
उज्ज्वला योजना ही पाच घटकांवर लक्ष केंद्रीत करते- प्रतिबंध, सुटका, पुनवर्सन, पुन्हा एकत्र आणणे आणि मानवी तस्करीला बळी पडलेल्या महिलांचे पुनवर्सन. मानवी तस्करीला प्रतिबंध करणे आणि पीडीतांची सुटका आणि पुनवर्सन करणे हा योजनेचा उद्देश आहे. राज्यवार विवरण परिशिष्ट- I मध्ये देण्यात आले आहे.
ही केंद्रपुरस्कृत योजना असून, योजनेत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि अंमलबजावणी करणाऱ्या संस्था यांच्यासाठी खर्चाचा वाटा 60:30:10 असा आहे.
11. कार्यरत महिलांसाठी वस्तीगृह
या योजनेच्या माध्यमातून कार्यरत महिलांना सुरक्षित आणि सोयीस्कर निवाऱ्याची व्यवस्था पुरवण्यात आली आहे. राज्यवार लाभार्थींचे विवरण परिशिष्ट- J मध्ये देण्यात आले आहे.
12. महिला शक्ती केंद्र
महिला शक्ती केंद्र योजनेच्या माध्यमातून 115 अतिमागास, आकांक्षी जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी स्वयंसेवकांच्या माध्यमातून समुदाय सहभाग निश्चित केला जातो. सरकारच्या प्रमुख योजनांविषयी विद्यार्थ्यांकडून जनजागृती केली जाते.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
परिशिष्ट-A ते परिशिष्ट- J साठी येथे क्लिक करा
* * *
M.Chopade/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1656010)
Visitor Counter : 1041