पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

भूमी अवनती कमी करण्यासाठी जागतिक उपक्रम आणि प्रवाळ कार्यक्रमाची जी-20 पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत सुरुवात


एका चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी जी-20 देशांसोबत काम करण्यासाठी भारत वचनबद्ध- प्रकाश जावडेकर

Posted On: 16 SEP 2020 10:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020

 

सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली जी-20 देशांच्या पर्यावरणमंत्र्यांच्या बैठकीचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये केंद्रीय पर्यावरण, हवामान बदल आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. पर्यावरण, वने आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी त्याचबरोबर प्रदूषण आणि हवामान बदलाच्या समस्यांना तोंड देण्यासाठी भारताने महत्त्वाची पावले उचलली आहेत, असे प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितले.

एका चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी जी-20 देशांसोबत  काम करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विपुल जैवविविधता आणि पर्यावरण प्रणालीचे वरदान भारताला लाभले आहे. प्रवाळांचे संवर्धन करण्यासाठी भारत उपाययोजना करत आहे, असे त्यांनी सांगितले. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी भारताने उचललेली पावले  उल्लेखनीय आहेत असे त्यांनी नमूद केले. हवामान बदलाच्या समस्येला तोंड देण्यासाठी आणि भक्कम परिणाम प्राप्त करण्यासाठी जगाने सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

 

 

राष्ट्रीय किनारपट्टी मोहीम कार्यक्रमांतर्गत, सरकारने देशातील प्रवाळांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना त्यांनी या बैठकीत अधोरेखित केले. भूमी अवनती टाळण्यासाठी आणि हवामान बदलाच्या समस्येला तोंड देण्यासाठी निर्धारित केलेल्या जागतिक उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी यावेळी माहिती दिली. समानता, सामाईक परंतु विकेंद्रित जबाबदारी, अर्थसाहाय्य आणि तंत्रज्ञान भागीदारी हे प्रमुख स्तंभ असल्याचा भारताचा विश्वास आहे आणि पॅरिस करार आणि त्यातील हवामानविषयक वचनबद्धता यांना अनुसरून भारताची वाटचाल सुरू आहे. या करारातील उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी भारताकडून योग्य प्रकारची पावले उचलली जात आहेत आणि या कराराचे अनुपालन करणाऱ्या काही मोजक्या देशांपैकी भारत एक देश आहे, यावर प्रकाश जावडेकर यांनी भर दिला.

Fotor_160025839166917.jpg

भूमी अवनती टाळणारा जागतिक उपक्रम आणि प्रवाळ कार्यक्रमाची आणि यावर्षी जी-20 अंतर्गत  उत्सर्जन व्यवस्थापनाशी संबंधित हवामान बदलविषयक आणि  हवामान बदल रुपांतरणावरील दोन दस्तावेजांची त्यांनी प्रशंसा केली. 

जी-20 सदस्य देशांमध्ये आणि जागतिक पातळीवर भूमी अवनतीला  प्रतिबंध करणे, थांबवणे आणि भूमी अवनती प्रक्रियेला उलट करणे यासाठी असलेल्या सध्याच्या आराखड्याच्या अंमलबजावणीला बळकटी देणे हा भूमी अवनती कमी करणाऱ्या जागतिक उपक्रमाचा उद्देश आहे. इतर देशांच्या कामगिरीचे संभाव्य परिणाम आणि कोणत्याही प्रकारची हानी न करण्याच्या सिद्धांतांना त्यात विचारात घेतले जाईल.

Fotor_160025556294156 (1).jpg

जागतिक प्रवाळ संशोधन आणि विकास चालना मंच एक नवनिर्मितीकारक कृती आधारित उपक्रम असून  सर्व प्रकारच्या प्रवाळ द्वीपांचे संवर्धन, पुनरुज्जीवन, रुपांतरण आणि त्यांच्या संवर्धनासाठी होणाऱ्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी जागतिक पातळीवरील संशोधन आणि विकासाला चालना देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

जावडेकर यांनी पर्यावरणमंत्र्यांच्या या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणारे महामहीम अब्दुलरहमान अल फदली यांचे आणि जपानचे शिनिजीरो कोईजुमी आणि इटलीचे सर्जियो कोस्टा यांचे या बैठकीचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले.


* * *

B.Gokhale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655358) Visitor Counter : 211


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali