नागरी उड्डाण मंत्रालय

वंदे भारत अभियानाअंतर्गत मायदेशी आलेल्या भारतीयांची माहिती

प्रविष्टि तिथि: 16 SEP 2020 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020

 

वंदे भारत अभियानाअंतर्गत  भारतीय विमान वाहतूक कंपन्यांची विशेष विमाने आणि भारतीय तसेच परदेशी कंपन्यांची चार्टर्ड विमाने, परदेशातून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी चालवली जात आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट 2020 पर्यंत, एकूण 5817 विमानांद्वारे, परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले गेले आहे. सर्व प्रवाशांची देशनिहाय माहिती आणि विमान उतरल्याविषयीची राज्यनिहाय माहिती परिशिष्ट-अ मध्ये देण्यात आली आहे. (येथे क्लिक करा

तामिळनाडू सरकारने दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत अभियानाअंतर्गत,पाचव्या टप्प्याच्या अखेरपर्यंत तामिळनाडू इथे एकूण 585 विमानांचे उड्डाण झाले. टप्प्यानुसारची सविस्तर माहिती. परिशिष्ट-ब मध्ये देण्यात आली आहे. (येथे क्लिक करा

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंह पुरी यांनी आज राज्यसभेत ही महिती दिली.

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1655309) आगंतुक पटल : 180
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Manipuri , Punjabi , Tamil