रेल्वे मंत्रालय

किसान रेल

Posted On: 16 SEP 2020 5:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020

 

किसान रेल प्रकल्पांतर्गत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय,  राज्य सरकारच्या कृषी / पशुसंवर्धन / मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याशी सल्लामसलत करून , भाजीपाला, फळे आणि अन्य  नाशवंत पदार्थांच्या वाहतुकीचे संभाव्य मार्ग  निवडण्यात येत आहेत. दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी या वस्तूंच्या हंगामी उपलब्धतेच्या आधारे मूल्यांकन केले जात आहे, जेणेकरुन कार्यक्षमता आणि खर्चात बचत साध्य होईल.

किसान रेल प्रकल्पांतर्गत दोन रेल्वे सेवा - देवळाली आणि कोल्हापूर (महाराष्ट्र) ते मुझफ्फरपूर (बिहार) आणि अनंतपूर (आंध्र प्रदेश) ते आदर्श नगर (दिल्ली) यापूर्वीच कार्यरत आहेत. यशवंतपूर (कर्नाटक) ते निजामुद्दीन (दिल्ली) पर्यंत जाणारी आणखी एक सेवा लवकरच सुरू होईल.

रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती  दिली.  


* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655181) Visitor Counter : 143


Read this release in: English , Urdu , Punjabi , Tamil