भूविज्ञान मंत्रालय

नैऋत्य उत्तर प्रदेश आणि आसपासच्या भागात चक्रीवादळ घोंगावत आहे


राजस्थानात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

प्रविष्टि तिथि: 05 SEP 2020 7:37PM by PIB Mumbai

 

राजस्थान, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, ओदिशा , पूर्व मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल येथे पुढल्या 12 तासांत विजांच्या गडगडाटासह  वादळ येण्याची शक्यता

भारतीय हवामानशास्त्र  विभाग (आयएमडी) च्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्र / प्रादेशिक  हवामान केंद्रनवी दिल्ली नुसारः

नैऋत्य उत्तर प्रदेश आणि आसपासच्या भागात वादळ घोंगावत असून  राजस्थानात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता  आहे.

यामुळे राजस्थान, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, ओदिशा , पूर्व मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल येथे पुढल्या 12 तासांत विजांच्या गडगडाटासह  वादळ येण्याची शक्यता आहे.

5 ते 9 सप्टेंबर या काळात विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण भागात तुरळक ठिकाणी   विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

 

***

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1651692) आगंतुक पटल : 133
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri