जलशक्ती मंत्रालय
जल जीवन अभियान : मध्य प्रदेशातील आदिवासींच्या घरात नळाद्वारे पाणीपुरवठा
पाणीपुरवठा नियमितपणे चालू ठेवण्यासाठी आणि देखभाल कामात स्थानिक समुदायाचा पुढाकार
Posted On:
05 SEP 2020 4:02PM by PIB Mumbai
मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील कोलार खेड्यातील रहिवासी असलेल्या मुन्नी देवी यांची पहाटेच्या वेळी इतर कोणत्याही ग्रामीण बाईप्रमाणे लगबग सुरु होते मात्र पूजाअर्चनाही त्या नित्यनेमाने करतात. धूप आणि ताजी फुलं यांच्या सुगंधाने घर भरलेले असते आणि जेव्हा मुन्नीबाई 'नळा'वर टिळा लावतात तेव्हा कृतज्ञतापूर्वक आणि भक्तीने त्या नमन करतात कारण तो त्यांच्यासाठी केवळ पाणी देणारा नळ नाही तर एक देवाचे प्रतीक आहे; ते अशासाठी कि हा नळ लहान गंगेसारख्या पवित्र ‘पुत्र’ नदीतून पाणी वाहून आणतो. पूर्वी त्या धार्मिक विधीसाठी वर्षातून किंवा दोन वर्षातून एकदा अमरकंटक (नदीचा उगम) पर्यंत 150 किलोमीटर प्रवास करीत असत परंतु आता त्याच नदीचे पाणी घरगुती नळ जोडणीद्वारे त्यांच्या घरी पुरवले जाते.
राज्यांच्या भागीदारीत जलशक्ती मंत्रालयाने राबविलेल्या जल जीवन अभियानाचे उद्दिष्ट आहे ते 2024 पर्यंत देशातील प्रत्येक ग्रामीण घरात नियमित आणि दीर्घकालीन आधारावर विहित गुणवत्तेचे पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे. राज्यातील सर्व ग्रामीण कुटुंबाना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राने 2020-21 मध्ये मध्य प्रदेशात जल जीवन अभियानाच्या (जेजेएम) अंमलबजावणीसाठी 1,280 कोटी रुपये वितरित केले आहेत.
राज्यातील 1.21 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी 13.52 लाख कुटुंबाना नळ जोडणी देण्यात आली आहे, तर राज्य सरकारची 2020-21 मध्ये 26.7 लाख घरात नळ जोडणी देण्याची योजना आहे. आतापर्यंत 5.5 लाख नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत.
मुन्नीबाई यांच्या कोलार गावात 271 घरे आहेत. शेती व पशुसंवर्धन हे खेड्यातील रोजीरोटीचे मुख्य स्त्रोत आहेत. खेड्यात एक प्राथमिक शाळा आणि एक अंगणवाडी केंद्र आहे. पूर्वी, गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत म्हणजे कूपनलिका आणि हातपंप होते, मात्र उन्हाळ्याच्या हंगामात पाण्याचे हाल होते. मुन्नीबाई सांगतात कि त्यांना “या नळ जोडणीपूर्वी जवळपासच्या विहिरीतून पाणी आणावे लागे आणि उन्हाळ्याच्या काळात मी पिण्याच्या पाण्यासाठी 1-2 कि.मी. पायपीट करावी लागे.” नळ जोडणी नसल्यामुळे त्या भागातील अनेक महिला व मुलींच्या जीवनावर परिणाम झाला, शाळांमध्ये मुलींचे प्रमाण घटले. कधीकधी पाण्याची कमतरता इतकी गंभीर होती की त्यामुळे पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने गावातील लोकांना उघड्यावर शौचास जावे लागे
पाणीटंचाईवर उपाय म्हणून आणि कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची योजना उपलब्ध करुन देण्यासाठी खासदार जल निगम (एमपीजेएनएम) यांनी पृष्ठभागाच्या पाण्याच्या स्त्रोतांवर आधारित बहु-ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविली. मानपूर बहु उद्देशीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना ग्रामीण घरांना पुरेसे पिण्याचे पाणी पुरविणारी योजना आहे. यापूर्वी राज्यात व देशात राबविल्या जाणार्या ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा आढावा घेताना हे लक्षात आले की ग्रामीण पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांच्या यशस्वीतेसाठी समाजाचा सहभाग तितकाच महत्वाचा आहे. एमपीजेएनएम योजना अंमलबजावणीच्या प्रत्येक स्तरावर समुदायाला सामील करण्यासाठी उपाययोजना करीत आहे.
लोकसहभाग वाढविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून जनसभा, ग्रामसभा, पथनाट्ये, शाळा रॅली यासारखे उपक्रम राबविले जातात.
संस्थेच्या समुदायात सहभागासाठी आवश्यक असणारी संस्था म्हणून, हितधारकांमध्ये मालकीची भावना रुजविण्यासाठी "ग्रामीण जल आणि स्वच्छता समिती (व्हीडब्ल्यूएससी)" ची स्थापना केली जाते.
कोलार गावच्या व्हीडब्ल्यूएससीचे सध्या 16 सदस्य आहेत, त्यापैकी 8 महिला आहेत. व्हीडब्ल्यूएससी कोलार यांनी आतापर्यंत 95 कुटुंबाकडून 11,000 रुपये नवीन जोडणीसाठी आणि सुरक्षेसाठी शुल्क घेतले असून आणि प्रतिमाह 80 रुपये प्रत्येक कुटुंबातून पाणीपट्टी म्हणून संकलित केले आहेत. आता मुन्नीबाई आणि इतर स्त्रिया त्यांच्या धडपड आणि त्रासातून बाहेर पडत आहेत.
दुर्गम खेड्यात होणारी ही क्रांती प्रभावी नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनात स्थानिक समुदायाच्या भूमिकेचे परिमाण दर्शविते. खर्या अर्थाने जल जीवन अभियान तळागाळातील जबाबदार नेतृत्व विकसित करण्यास सक्षम करीत आहे.
खेड्यांमधील पाणीपुरवठा योजनांचे नियोजन, अंमलबजावणी, व्यवस्थापन, आणि देखभाल याची जबाबदारी स्थानिक समुदायाने स्वीकारली पाहिजे जेणेकरुन प्रत्येक ग्रामीण घरातील लोकांना नियमित आणि दीर्घ मुदतीच्या आधारावर पिण्यासाठी पाणीपुरवठा करता येईल.
M.Jaitly/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651648)
Visitor Counter : 160