सांस्कृतिक मंत्रालय

ब्रिक्सच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या पाचव्या बैठकीत केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह  पटेल आभासी स्वरूपात सहभागी


सांस्कृतिक बंधांमध्ये सर्व मानवनिर्मित अडथळे पार करत, लोकांना प्रेम आणि सोहार्दाने जोडण्याची शक्ती -  पटेल

Posted On: 04 SEP 2020 10:04PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल काल ब्रिक्स सदस्य राष्ट्रांच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या पाचव्या बैठकीत आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. रशियाच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. भारतासह ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे सांस्कृतिक मंत्री यात सहभागी झाले होते.

या बैठकीत, ब्रिक्सच्या सांस्कृतिक विश्वावर कोविडच्या झालेल्या परिणामांविषयी चर्चा झाली. ब्रिक्स अंतर्गत सुरु असलेल्या सांस्कृतिक उपक्रमांना ऑनलाईन पद्धतीने सुरु ठेवता येईल का, यावरही यावेळी चर्चा झाली. ब्रिक्स सदस्य देशांनी पर्यायी मार्गांनी आपले सांस्कृतिक बंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रल्हाद सिंह यावेळी म्हणाले.

कोविड-19 हा आपल्यासाठी अत्यंत दुखःद अनुभव आहे. मात्र या अनुभवातून आपल्याला हे ही कळले की निसर्ग देशांमध्ये भेदभाव करत नाही. मानवाने देशांमध्ये सीमा निर्माण करुन विभाजन केले आहे. मात्र संस्कृती हा असा बंध आहे, जो या सर्व मानवी भेदभावांच्या पलीकडे जात, प्रेम आणि सौहार्दाने जोडतो. त्यामुळेच, जेव्हा आपण अशा कार्यक्रमात भेटतो, तेव्हा आपण सांस्कृतिक दृष्ट्या अधिक समृध्द होतो, असे प्रल्हाद पटेल यावेळी म्हणाले.

वर्ष 2021 च्या अखेरपर्यंत ब्रिक्स राष्ट्रांनी सामाईक संकल्पनेच्या आधारावर डिजिटल ऑनलाईन प्रदर्शन भरवण्याच्या कल्पनेवर या बैठकीत चर्चा झाली.त्याशिवाय इतरही ऑनलाईन कार्यक्रमांच्या आखणीवर चर्चा झाली. 

बैठकीच्या शेवटी पाचव्या बिक्र्स सांस्कृतिक बैठकीचा जाहीरनामा सादर करण्यात आला, ज्यावर सर्व सदस्य राष्ट्रांनी सहमती व्यक्त केली.

****

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1651513) Visitor Counter : 197


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi