अर्थ मंत्रालय

जुलै 2020 महिन्यासाठीच्या जीएसटीआर-2B ची सुरुवात

Posted On: 29 AUG 2020 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑगस्‍ट 2020

 

जीएसटी परिषदेने, 14 मार्च 2020 रोजी झालेल्या 39 व्या बैठकीत जीएसटीआर-3B आणि जीएसटीआर-1 आणि जीएसटीआर-2A  यातील महत्त्वपूर्ण बदल स्वीकारुन आणि विकासात्मक दृष्टीकोनातून त्यांची जोडणी जीएसटीआर-3B सोबत करण्याची शिफारस केली होती. परिषदेने शिफारस केलेली अशी एक वाढ म्हणजे प्रत्येक करदात्यास उपलब्ध असलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटला सहाय्य / निर्धारित करण्यात मदत करणारे स्वयं-मसुदा इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) सादर करणे.      

जीएसटीआर-2B हे अशाप्रकारचा स्वयं-मसुदा (आयटीसी) तपशील असेल जो प्रत्येक नोंदणीकृत व्यक्तीसाठी जीएसटीआर-1, 5 (अनिवासी करपात्र व्यक्ती) आणि 6 (इनपुट सेवा वितरक) अंतर्गत पुरवला जाईल. हा तपशील प्रत्येक महिन्याच्या 12 व्या दिवशी उपलब्ध करुन दिला जाईल. अशी अपेक्षा आहे की, जीएसटीआर-2B बी रिटर्न तयार करण्यासाठी घेतलेल्या वेळेत कपात करण्यात मदत करेल, त्रुटी कमी करेल, सलोखा राखण्यास मदत करेल आणि परतावा भरण्याची प्रक्रिया सुलभ करेल.

जीएसटीआर-2B मुळे करदात्यांना परतावा दाखल करताना पुढील मदत होईल:

  1. आईसगेट प्रणालीअंतर्गत आयात मालाची माहिती, यात विशेष आर्थिक क्षेत्रातील युनिटस/विकासकांकडून मिळालेला माल याची माहिती यात असेल. जुलै 2020 च्या जीएसटीआर-2B मध्ये ही माहिती नसणार आहे ती लवकरच उपलब्ध करुन दिली जाईल.
  2. कर परताव्याचे संक्षिप्त स्टेमेंट प्रत्येक घटकांतर्गत उपलब्ध करुन दिले जाईल. जीएसटीआर-3B साठी प्रत्येक करदात्याला कराव्या लागणाऱ्या कृतीची माहिती दिली जाईल;
  3. सर्व पावत्या, क्रेडिट नोट्स, डेबिट नोट्स इ. चे दस्तावेज पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील.

 

  • जुलै 2020 महिन्यातील जीएसटीआर-2 B सामान्य पोर्टलवर चाचणी आधारावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
  • हे स्टेटमेंट प्रथमच सादर केले जात असल्याने करदात्यांना केवळ अभिप्राय उद्देशाने जुलै, 2020 महिन्यात जीएसटीआर-2B चा संदर्भ घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  • सर्व करदात्यांना जुलै 2020 मध्ये त्यांच्या जीएसटीआर-2B मधून चा संदर्भ घेण्याची विनंती करण्यात आली आहे आणि जुलै 2020 मध्ये त्यांनी घेतलेले भांडवल (क्रेडिट) सोबत तुलना केल्यावर जीएसटीआर-2 बी च्या कोणत्याही बाबीवर स्वत: (https://selfservice.gstsystem.in/) या पोर्टलवर अभिप्राय द्यावा.
  • सर्व करदात्यांना स्टेटमेंट वापरण्यापूर्वी सामान्य पोर्टलवर जीएसटीआर -2 बी संबंधित तपशील पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

करदात्यांनी जीएसटीआर-2B च्या माध्यमातून, जीएसटी पोर्टलवर लॉग इन करावे>रिटर्न्स डॅशबोर्ड>परताव्याचा कालावधी निवडावा> GSTR-2B अंतर्गत. 

 

* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649621) Visitor Counter : 210