रेल्वे मंत्रालय

मालवाहतुकीला चालना देण्यासाठी शुल्क आणि अशुल्क माल वाहतूक शुल्क आणि शुल्केतर क्षेत्रात भारतीय रेल्वेने राबवले अनेक उपक्रम

अनेक सवलती जाहीर

शुल्क क्षेत्रात माल भरलेले कंटेनर, पॉंड ऍश/ओलावा असलेली राख (ओपन वॅगन) यावर सवलत, दोन टप्पे/छोट्या डब्यातून

मालवाहतुकीवरील अधिभार रद्द, राउंड ट्रीप शुल्क धोरण, लॉंग आणि शॉर्ट लीड सवलत जाहीर

5% ते 50% टक्के सवलत

कोविड निर्बंधांच्या काळातही ऑगस्ट 2020 मध्ये, गेल्या वर्षीच्या तुलनेत मालवाहतुकीत 4.3% ची वाढ


Posted On: 28 AUG 2020 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2020

कोविड च्या संकटकाळातही मालवाहतुकीला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. ज्याचा परिणाम म्हणून, ऑगस्ट 2020 या महिन्यात, (27 ऑगस्ट पर्यंत) गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या मालवाहतुकीच्या तुलनेत 4.3%  टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात (27 ऑगस्ट पर्यंत) एकूण 81.33 दशलक्ष टन मालवाहतूक झाली, गेल्यावर्षी ही मालवाहतूक 77.97  दशलक्ष टन इतकी होती.

माल वाहतूक शुल्क आणि शुल्केतर क्षेत्रात भारतीय रेल्वेने हाती घेतलेले उपक्रम :

कोविड संकटाचा संधी म्हणून वापर करत, भारतीय रेल्वेने मालगाडयांचा वेग लक्षणीयरीत्या वाढवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत, मालवाहतुकीच्या वेगात 72 % वाढ झाली आहे. ऑगस्ट 2019 च्या तुलनेत ऑगस्ट 2020 मध्ये मालगाडयांचा वेग 94 % वाढला आहे.

मालवाहतुकीला चालना देण्यासाठी शुल्क तर्कसंगत करण्याच्या दृष्टीने रेल्वेने हाती घेतलेल्या उपाययोजना:

 1. माल भरलेल्या कंटेनरवर 3 ऑगस्ट 2020 पासून 5% सवलत. (रिकाम्या कंटेनरवर  आणखी 25%)
 2. उर्जा प्रकल्प, सिमेंट प्रकल्पासाठी पॉंड ऍश/ओलावा असलेली राख (ओपन वॅगन) यांच्या मालावाहतुकीवर 40%टक्के सवलत 
 3. औद्योगिक मीठाच्या वर्गीकरणात बदल- 3 ऑगस्ट 2020 पासून रसायन उद्योगासाठीच्या मीठाचे वर्गीकरण 120 पासून 100A श्रेणीत
 4. मालवाहतूक होणाऱ्या खाजगी गाड्या आणि वाहने ठेवून घेण्यासाठी लागणारे शुल्क 3 ऑगस्ट 2020 पासून 31 ऑक्टोबर पर्यंत रद्द.

मालवाहतुकीला चालना देण्यासाठी शुल्क तर्कसंगत करण्याच्या दृष्टीने रेल्वेने हाती घेतलेल्या  आणखी काही उपाययोजना खालीलप्रमाणे :

 1. व्यस्त हंगामात लावले जाणारे विशेष शुल्क रद्द –कोळसा, लोहखनिज आणि कंटेनर वगळता इतर क्षेत्रातील सर्व मालवाहतुकीवरील 15% टक्के शुल्क 1 ऑक्टोबरपासून माफ
 2. सिमेंट, लोह आणि पोलाद, अन्नधान्य, खते आणि घाऊक BOG यांच्या दोन टप्पे/ छोटे डबे  यातून होणाऱ्या मालवाहतुकीवरील 5 % अधिभार, 1 ऑक्टोबरपासून  रद्द
 3. ओपन वॅगन मधून उर्जा प्रकल्प, सिमेंट प्रकल्पासाठी केल्या  जाणाऱ्या फ्लाय ऍशच्या मालवाहतुकीवर  40% टक्के सवलत, 10 मे पासून लागू.
 4. पर्यायी टर्मिनल व्यवस्था- प्रति रेक 56,000 ते 80,000 रुपये सर्वक्षेत्रांसाठी लागू- 27 जूनपासून.
 5. राऊंड ट्रीप शुल्क धोरण-सर्व क्षेत्रांसाठी निम्न श्रेणीतील दर 1 जुलैपासून लागू.
 6. लाँग लीड सवलत- कोळसा, लोह खनिज, आणि पोलाद यावर 1 जुलैपासून 15 ते 20% सवलत
 7. शॉर्ट लीड सवलत- 10 ते 50 %  सर्व क्षेत्रांसाठी  (कोळसा आणि लोहखनिज वगळता) 1 जुलैपासून लागू .

मालवाहतुकीला चालना देण्यासाठी अशुल्क क्षेत्रात रेल्वेने केलेल्या काही उपाययोजना खालीलप्रमाणे  :

 1. वाहन वाहतुकीसाठी दोन टप्प्यांत वाहन उतरवण्यासाठी परवानगी, 5 ऑगस्ट पासून लागू
 2. सर्व क्षेत्रात, खाजगी वाहतुकीत इतर वापरकर्त्यांवर घालण्यात आलेली मर्यादा रद्द करण्यात आली आहे- निर्णय 18 ऑगस्टपासून लागू.
 3. पार्सल ट्राफिकसाठी सर्व खाजगी सायडिंग/ मालसाठा/ खाजगी माल टर्मिनल सुरु करण्यात आले आहेत- निर्णय 18 ऑगस्टपासून लागू.
 4. इण्डेनटेड पार्सलच्या छोट्या आकाराच्या बांधणीत 31 मार्च 2021 पर्यंत वाढ. 
 5. वेळापत्रकानुसार चालणाऱ्या पार्सल ट्रेन एक्सप्रेसमध्ये वाढ-31 डिसेम्बरपर्यंत लागू.
 6. ग्रीनफिल्ड PFT साठीच्या आवेदन शुल्कात सवलत -10 लाखपासून 20 हजारपर्यंत कमी इत्यादी..

मालवाहतूक वाढवण्यासाठी रेल्वेने केलेल्या इतर उपाययोजना पुढीलप्रमाणे :

 1. उद्योग विकास विभागांची स्थापना - (BDUs)– विभाग, क्षेत्र आणि बोर्ड पातळीवर
 2. खाजगी सायडिंगच्या इतर उपयोगावरील निर्बंध रद्द- - 1,079 खाजगी सायडिंगचा खाजगी माल टर्मिनल म्हणून वापर  करण्यास परवानगी
 3. 405 महत्वाच्या मालवाहतूक गोदामांची दुरुस्ती- अत्याधुनीकरण ज्यामुळे तीन पाळ्यात काम करणे शक्य
 4. वेळापत्रकानुसार पार्सल ट्रेन
 5. पार्सल, कंटेनर आणि वाहनांसाठी बांगलादेशात निर्यात वाहतूक खुली
 6. नाशिकच्या देवळालीपासून ते पाटण्याच्या दानापूर पर्यंत किसान रेल सुरु. अनेक ठिकाणी थांबे, विविध वस्तू, विविध शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक- ही ट्रेन आता मुझफ्फरपूर पर्यंत वाढवण्यात आली- त्याला कोल्हापूर ते मनमाड ही लिंक देखील जोडण्यात आली आहे. 24 ऑगस्टपासून ही गाडी आठवड्यात दोनदा धावते आहेत. आतापर्यंत चार फेऱ्या पूर्ण.

कोविडच्या काळाचा संधी म्हणून वापर करत, रेल्वेने आपल्या मालवाहतुकीचा वेग प्रचंड वाढवला आहे.

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1649402) Visitor Counter : 14