पर्यटन मंत्रालय

पर्यटन मंत्रालयाकडून स्वातंत्र्यदिन विशेष म्हणून ‘संस्मरणिका 1857-स्वातंत्र्याची नांदी’ या शिर्षकाखाली पहिला वेबिनार आयोजित

Posted On: 10 AUG 2020 7:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020

भारताचे स्वातंत्र्ययुद्ध हा देशाच्या इतिहासातील महत्वाचा भाग आहे. आणि भूतकाळातील कोणत्याही महत्वाच्या प्रसंगापेक्षा त्याचे महत्व अपार आहे. पर्यटन मंत्रालयाने देशाच्या या संस्मरणीय आणि मानाच्या दिवसाच्या स्मृतीखातर  ‘देखो अपना देश ’ या वेबिनार मालिकेअंतर्गत  पाच वेबिनार्सचे आयोजन केले आहे. हे सर्व वेबिनार एकत्रितरीत्या स्वातंत्र्ययुद्धाचा आढावा, त्याचे महत्व विशद करणे, ज्यांनी देशाची स्वातंत्र्याकडे वाटचाल व्हावी यासाठी पुढाकार घेतला त्यांचे  स्मरण करतील.

पर्यटन मंत्रालयाने ‘संस्मरणिका 1857-स्वातंत्र्याची नांदी’ (मेमॉयर्स ऑफ 1857-अ प्रिल्युड ऑफ इंडिपेन्डन्स) या शिर्षकाच्या वेबिनारचे आयोजन 8.8.2020 रोजी केले गेले. स्वातंत्र्यदिन विशेष वेबिनार अंतर्गत हा पहिलाच आणि संपूर्ण देखो अपना देश वेबिनार्स अंतर्गत हा 45 वा वेबिनार होता.  ‘देखो अपना देश’  ही वेबिनार  मालिका एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत भारताची सांस्कृतिक विविधता प्रदर्शित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग  आहे आणि ती सातत्याने एक भारत श्रेष्ठ भारत च्या उत्सवाला आभासी व्यासपीठावर आणते.

हा वेबिनार निधी बन्सल, संचालक भारत सिटी वॉक्स आणि इंडिया विथ लोकल्स  आणि सौमी रॉय, संशोधक आणि स्टोरी टेलर यांच्याकडून तर अतिरिक्त  महासंचालक, पर्यटन मंत्रालय  रुपिंदर ब्रार यांच्या माध्यमातून  सादर केला गेला.  आपल्या स्वातंत्र्यलढ्याची गाथा आभासी पद्धतीने या वेबिनारमधून सांगितली गेली.  भारताचे पहिले स्वातंत्रयुद्ध 1857 मध्ये लढले गेले आणि अश्याच प्रकारची प्रयत्नमालिका 1947 म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत सुरू राहिली. सादरकर्त्यांनी स्मारके, युद्धाची तयारी जिथे झाली ती ठिकाणे जसेकी  दिल्ली, मिरत आणि देशभरातील अनेक शहरांतील शौर्य, त्याग आणि  धैर्यांची कथा प्रेक्षकांपुढे प्रदर्शित केली.

उठावाला कारणीभूत असणारी सामाजिक- आर्थिक दूरावस्था, जमीन आणि महसूल व्यवस्थापन यातील अन्याय, कोलमडलेली अर्थव्यवस्था, व्यवस्थापनात भारतीयांचा नगण्य सहभाग, बहादूरशाह ज़फरला दिलेली हीन वागणूक, औंध खालसा करणे, पोलिस व न्यायव्यवस्थेतील भेदभाव, आणि भारतीय शिपायांप्रती भेदभाव अश्या अनेक बाबींची कारण मिमांसा सादरकर्त्यांनी मांडली.

देखो अपना देश वेबिनार मालिका ही राष्ट्रीय गवर्नर्स विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या तंत्र सहाय्याने सादर करण्यात आली. या वेबिनारचे भाग आता https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featuredवर उपलब्ध आहेत. तसेच भारताच्या पर्यटन मंत्रालयच्या समाजमाध्यम व्यासपीठावरही ते उपलब्ध आहेत.

 

 

 

 

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644908) Visitor Counter : 239


Read this release in: Punjabi , Tamil , English , Hindi