आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आरोग्य मंत्रालय उच्च कोविड-19 मृत्यू दर असणाऱ्या जिल्ह्यांसोबत सतत समन्वय साधत आहे


मृत्युदर रोखण्यासाठी आणि कमी करण्यासाठी केंद्रीय सल्लागार आणि मार्गदर्शक तत्वांनी सुचविलेल्या उपायांचे पालन करण्याचा सल्ला

Posted On: 07 AUG 2020 11:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्‍ट 2020

 

कोविड-19 साथीच्या आजाराचे प्रभावी नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी केंद्र-राज्य समन्वित धोरणाचा एक भाग म्हणून, आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अधिकाधिक कोविड-19 मृत्युदर असणाऱ्या जिल्ह्यांतील घटकांचे विश्लेषण करण्यासाठी आणि हा मृत्युदर कमी करण्यासाठी उपयायोजना शोधण्यासाठी जिल्हा आणि राज्य प्रशासनासोबत समन्वय साधण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

चार राज्यांतील 16 जिल्हे त्यामध्ये गुजरातमधील अहमदाबाद आणि सूरत; कर्नाटकातील बेळगावी, बंगळुरू शहरी भाग, कलबुर्गी आणि उडुपी; तामिळनाडूमधील चेन्नई, कांचीपुरम, रानीपेट, थेनी, तिरुवल्लूर, तिरुचिराप्पल्ली, तूतीकोरिन आणि विरुधनगर; तेलंगणामध्ये हैदराबाद व मेदचल मलकाजगिरी यांचा समावेश आहे. उच्च मृत्यू दरा व्यतिरिक्त,भारतातीलएकूण सक्रीय रुग्णांपैकी 17% सक्रिय रुग्ण या जिल्ह्यांमध्ये आहेत तसेच दररोज मोठ्या संख्येने नवीन रुग्णांची नोंद होत आहे; प्रती दशलक्ष लोकांमागे सर्वात कमी चाचणीचे प्रमाण आणि सर्वाधिक बाधित रुग्णांची पुष्टी या जिल्ह्यांमध्ये होत आहे.

कोविड-19 चे रूग्ण आणि इतरांमधील रुग्ण विशेषत: गर्भवती महिला, वृद्ध आणि मुले यांच्यामधील मृत्युच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेलं सल्लामसलत, मार्गदर्शक तत्त्वे आणि क्लिनिकल ट्रीटमेंट प्रोटोकॉलचे पालन करून त्यांची सुनिश्चित अंमलबजावणी करण्याचा सल्ला या जिल्ह्यांना देण्यात आला आहे.

रुग्णवाहिकांची वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्याव्यतिरिक्त, चाचणी प्रयोगशाळांच्या पूर्ण क्षमतेचा वापर सुनिश्चित करणे, प्रति दशलक्ष लोकसंख्येच्या चाचण्या वाढविणे आणि कोरोना बाधितांची टक्केवारी कमी करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला.राज्यांना अंदाजित खाटा आणि ऑक्सिजनची उपलब्धता आणि आवश्यकता यांचे विश्लेषण आणि वेळेत योजना करण्याचा सल्लाही देण्यात आला. आरोग्यसेवा कामगारांमध्ये संसर्ग नियंत्रित करण्यासाठी चांगल्या संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण पद्धती सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. 


* * *

M.Iyengar/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644345) Visitor Counter : 155