अर्थ मंत्रालय
शासकीय समभाग 5.22% जीएस 2025, 6.19% जीएस 2034 आणि 7.16% जीएस 2050 च्या विक्रीची लिलाव प्रक्रिया (पुन्हा जारी)
Posted On:
06 JUL 2020 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2020
केंद्र सरकारने (i) ‘मूल्य आधारित लिलावाद्वारे 12,000 कोटी (नाममात्र) च्या अधिसूचित रकमेसाठी ‘5.22% सरकारी स्टॉक, 2025 ' (ii)मूल्य आधारित लिलावाद्वारे 11,000 कोटी (नाममात्र) च्या अधिसूचित रकमेसाठी '‘6.19 टक्के सरकारी स्टॉक, 2034, (iii )मूल्य आधारित लिलावाद्वारे 7,000 कोटी (नाममात्र) च्या अधिसूचित रकमेसाठी 7.16 टक्के सरकारी स्टॉक, 2050' विक्रीची घोषणा केली आहे. वरीलपैकी एक किंवा अधिक सिक्युरिटीजच्या तुलनेत प्रत्येकी 2,000 कोटी रुपयांपर्यंत अतिरिक्त योगदान ठेवण्याचा सरकारकडे पर्याय असेल. 10 जुलै 2020 रोजी (शुक्रवारी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई कार्यालय, फोर्ट, मुंबईतर्फे लिलाव केला जाईल.
समभागांच्या विक्रीच्या अधिसूचित रकमेच्या 5% पर्यंत सरकारी सिक्युरिटीजच्या लिलावामध्ये बिगर स्पर्धात्मक निविदा सुविधा योजनेनुसार पात्र व्यक्ती आणि संस्थांना वाटप केले जाईल.
लिलावासाठी दोन्ही स्पर्धात्मक आणि बिगर स्पर्धात्मक निविदा 10 जुलै 2020 रोजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) प्रणालीवर सादर कराव्यात. बिगर -स्पर्धात्मक निविदा सकाळी 10.30 ते 11.00 दरम्यान सादर कराव्यात आणि स्पर्धात्मक निविदा सकाळी 10.30 ते 11.30 दरम्यान सादर कराव्यात.
लिलावाचा निकाल 10 जुलै, 2020 (शुक्रवार) रोजी जाहीर करण्यात येईल आणि यशस्वी निविदाकारांकडून भरणा 13 जुलै 2020 (सोमवार) रोजी होईल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या परिपत्रक क्र. आरबीआय / 2018-19 / 25 दिनांक 24 जुलै, 2018 अंतर्गत जारी केलेल्या 'केंद्र सरकारच्या सिक्युरिटीजमध्ये “केंव्हा जारी केले ' संबंधी मार्गदर्शक सूचनांनुसार 'केव्हा जारी केले' साठी पात्र असतील.
* * *
S.Thakur/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1636911)
Visitor Counter : 178