सांस्कृतिक मंत्रालय

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या आषाढ पौर्णिमेला धम्मचक्र दिन उत्सवाचे उद्घाटन करणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित करतील

Posted On: 03 JUL 2020 10:30PM by PIB Mumbai

 

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने होणाऱ्या धम्मचक्र दिन कार्यक्रमाचे उद्घाटन, राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथून करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी व्हिडिओद्वारे विशेष संदेश देतील. तसेच राष्ट्रपती कल्टामागिन बाटुलगा यांचा संदेश मंगोलियाचे भारतातील राजदूत गोन्चिंग गनोबिड उद्या राष्ट्रपती भवनातील या कार्यक्रमात वाचून दाखवतील.

धम्मचक्र दिनाचा उत्सव आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट संघाने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. याआधी आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट संस्था आणि संस्कृती मंत्रालयाने 7 मे ते 16 मे 2020 दरम्यान आभासी वेसाक आणि जागतिक प्रार्थना सप्ताह संयुक्तपणे यशस्वीरित्या पार पाडला होता.

संस्कृती मंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रल्हाद सिंह पटेल आणि अल्पसंख्यांक राज्यमंत्री किरण रिजीजू उद्घाटन समारंभाला संबोधित करतील. यानंतर दिवसभराचे कार्यक्रम मुलगंधा कुटी विहार, सारनाथ आणि महाबोधी मंदिर, बोधगया येथून भारतीय महाबोधी सोसायटी तसेच बोधगया मंदिर व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने प्रसारीत होतील.

याचे प्रक्षेपण https://youtu.be/B5a2n1iX0M8 याठिकाणी बघता येईल.

मान्यवर, बुद्धिस्ट संघांचे सर्वोच्च प्रमुख, जगभरातील ख्यातमान व्यक्ती, विद्वज्जन, तसेच आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट संस्थेचे उपप्रभाग व सभासद संस्थाही यात सहभागी होतील.

*****

S.Pophale/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1636384) Visitor Counter : 78