भारतीय स्पर्धा आयोग

भारतीय स्पर्धा आयोगाने जाधू होल्डिंग एलएलसीला जिओ मंचातील 9.99 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यास दिली मंजुरी

Posted On: 24 JUN 2020 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जून 2020


भारतीय स्पर्धा आयोगाने जाधू होल्डिंग एलएलसीला जिओ मंचातील 9.99 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. या प्रस्तावित संयोजनात जाधू होल्डिंग एलएलसी द्वारे जिओ मंच मर्यादित मध्ये सुमारे 9.99 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

जाधू ही अप्रत्यक्षपणे फेसबुकच्या मालकीची एक उपकंपनी आहे. जाधू, ही मार्च 2020 मध्ये अमेरिकेच्या डेलावेर स्टेटच्या कायद्यांतर्गत नव्याने समाविष्ट केलेली एक कंपनी आहे. फेसबुकचे मुख्यालय अमेरिकेमधील कॅलिफोर्निया येथे असून, ही एनएएसडीएक्यू मध्ये सूचीबद्ध असलेली एक सार्वजनिक व्यापार कंपनी आहे. 2004 मध्ये फेसबुकची स्थापना करण्यात आली होती. लोकांना, समुदाय निर्माण करण्याची आणि जगाला अधिक निकट आणण्याची शक्ती प्रदान करणे हे याचे उद्दिष्ट आहे. फेसबुक गट विविध उत्पादने आणि सेवा प्रदान करतो जे लोकांना त्यांचे मित्र आणि कुटूंबाशी संपर्क साधण्यास, समुदाय शोधण्यात आणि व्यवसाय वाढविण्यात मदत करते.

जिओ मंच ही भारतीय कायद्यांतर्गत संघटीत आणि विद्यमान कंपनी असून ती आरआयएलची सहय्यक कंपनी आहे. जिओ मंचाकडे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे डिजिटल अॅप्लिकेशनची मालकी असून हा मंच ती कार्यान्वित करते तसेच तंत्रज्ञानाशी संबंधित विशिष्ट संस्थांमध्ये नियंत्रित गुंतवणूक देखील करते. रिलायन्स जिओ इन्फोकॉम मर्यादित (आरजेआयएल) च्या जारी केलेल्या आणि थकित भांडवलाची 100 टक्के हिस्सेदारी देखील  जिओ मंचाकडे आहे. आरजेआयएल ही भारतातील एक पब्लिक लिमिटेड कंपनी असून ही परवानाधारक दूरसंचार ऑपरेटर आहे जी देशभरातील वापरकर्त्यांना दूरसंचार सेवा प्रदान करते.


सीसीआयचा सविस्तर आदेश नंतर जारी केले जाईल.


* * *

G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1634091) Visitor Counter : 199