विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
डॉ. हर्ष वर्धन यांनी कोविड चाचणीसाठी डीबीटी-एएमटीझेड फिरत्या प्रयोगशाळेचे केले उद्घाटन
"देशाच्या दुर्गम भागात कोविड चाचणीसाठी डीबीटी चाचणी हबच्या माध्यमातून ही मोबाइल चाचणी सुविधा तैनात केली जाईल": डॉ हर्ष वर्धन
आंध्र प्रदेश मेड-टेक टीमने डीबीटीच्या सहकार्याने 8 दिवसांच्या विक्रमी वेळेत ही आय-लॅब तयार केली आहे
युनिटमध्ये जैव-सुरक्षा सुविधायुक्त आणि आरटी-पीसीआर तसेच एलिसा चाचण्या करण्यास सक्षम आहे
Posted On:
18 JUN 2020 10:39PM by PIB Mumbai
विज्ञान आणि तंत्रज्ञान, भु-विज्ञान, आरोग्य आणिव कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी नवी दिल्ली येथे भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील कोविड चाचणीसाठी देशातील पहिल्या आय-लॅब (संसर्गजन्य रोग निदान प्रयोगशाळा) चे उद्घाटन केले. जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. डॉ. जितेंद्र शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, आंध्र मेड टेक झोन आणि नीती आयोग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, एमईआयटीवाय, इतर मंत्रालये, आयसीएमआर, डीएसटी, सीएसआयआर इत्यादीचे वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन वेबच्या माध्यमातून या कार्यक्रमास उपस्थित होते.
आय-लॅब, संसर्गजन्य रोग निदान प्रयोगशाळा - मोबाइल चाचणी सुविधा सुरू केल्याबद्दल आनंद व्यक्त करत डॉ. हर्ष वर्धन यांनी ग्रामीण भारतातील कोविड चाचणी उपलब्ध करून देण्यासाठी ही सुविधा समर्पित केली. देशाच्या दुर्गम भागात कोविड चाचणीसाठी डीबीटी चाचणी हबच्या माध्यमातून ही मोबाइल चाचणी सुविधा तैनात केली जाईल. त्यांनी कोविडच्या साथीवर उपाय शोधण्याच्या डीबीटीच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि ते म्हणाले की डीबीटीने हब आणि स्पोक मॉडेलचा अवलंब करून कोविड चाचणी केंद्र म्हणून आपल्या प्रीमियर प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. देशात आता 100 चाचणी प्रयोगशाळा असलेली 20 हून अधिक केंद्रं आहेत आणि यामध्ये 2,60,000 पेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.
डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, "देशातील सद्यस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि प्रगतीशीलतेने आत्मनिर्भरतेच्या टप्प्याकडे वाटचाल करण्यासाठी डीबीटी-एएमटीझेड कोविड मेडेटेक उत्पादन कन्सोर्टिया च्या माध्यमातून हे शक्य झाले आहे." आय-लॅब या केंद्रांच्या माध्यामातून दुर्गम ठिकाणी तैनात केली जाईल.” निरंतर, समर्पित आणि कटीबद्ध प्रयत्नांच्या माध्यमातून टाळेबंदीच्या काळात देशासाठी ही अनोखी, नाविन्यपूर्ण सुविधा निर्माण करण्यासाठी मंत्र्यांनी आंध्र मेड-टेक झोन टीमचे कौतुक केले. ते म्हणाले की, डीबीटीच्या सहकार्याने एएमटीझेडने सुरुवातीला आयात करण्यात येत असलेल्या विविध चाचण्यांसाठी कीट आणि अभिकर्मकांची स्वदेशी निर्मितीची सुविधादेखील उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे पंतप्रधानांचे ‘मेक इन इंडिया, मेक फॉर इंडिया’ हे स्वप्न साकार करण्यास मदत केली आहे. ते म्हणाले की, आज देशात 953 चाचणी प्रयोगशाळा आहेत. त्यांनी "संशोधन घटकांचे स्वदेशीकरण आणि त्यांच्या देशातंतर्गत उत्पादनासाठी मंत्रालय आणि विभागांनी उचललेली विविध पावले" यावर सविस्तर चर्चा केली. डॉ. हर्ष वर्धन यांनी जोर देऊन सांगितले की "नजीकच्या काळात या सर्व सामूहिक आणि सहकारात्मक प्रयत्नांमुळे भारत आरोग्य तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होईल आणि अशा प्रकारे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करेल."
यावेळी डॉ. रेणू स्वरूप म्हणाल्या की, भारतीय शास्त्रज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे देशाला दररोज सुमारे 5 लाख चाचणी कीट तयार करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. 31 मे 2020 पर्यंत एक लाख चाचणी कीट तयार करण्याचे लक्ष्य देशाने पार केले आहे. ही आय-लॅब डीबीटीच्या सहाय्याने आंध्र प्रदेश मेड-टेक झोन टीमने 8 दिवसांच्या विक्रमी वेळेत तयार केली आहे. राष्ट्रीय बायोफार्मा अभियाना अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बीआयआरएसी कडून हा उपक्रम राबविला जात आहे. ते म्हणाले की, युनिटमध्ये जैव सुरक्षा सुविधा आहेत आणि आरटी-पीसीआर आणि इलिसा चाचण्या करण्यास सक्षम आहेत.
डीबीटी-एएमटीझेड कमांड
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागासह, आंध्र प्रदेश मेड-टेक झोन (एएमटीझेड) ने डीबीटी-एएमटीझेड कमांड [कोविड मेडटेक उत्पादन विकास] समोद्देशी संघटनेची (कन्सोर्टियाची) स्थापना केली आहे जेणेकरुन भारतातील महत्वपूर्ण आरोग्य तंत्रज्ञानाची कमतरता दूर होईल आणि निरंतर आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जात आहे.
या समोद्देशी संघटने अंतर्गत, भारत बेंझकडून ऑटोमोटिव्ह चेसिस मिळाल्याच्या तारखेपासून 8 दिवसांच्या विक्रमी कालावधीत एएमटीझेड टीमने भारताची पहिली आय-लॅब (संसर्गजन्य रोग निदान प्रयोगशाळा) तयार केली आहे. हे जैव सुरक्षा सुविधा असलेले मोबाइल चाचणी युनिट आहे. आय-लॅबमध्ये ऑन-साईट इलिसा, आरटी-पीसीआर, जैव-रसायन विश्लेषण सुविधेसह बीएसएल -2 सुविधा आहे. हे एका दिवसात 50 आरटी-पीसीआर आणि सुमारे 200 एलिसा चाचण्या करू शकते. दोन मशिनच्या सहाय्याने, 8 तासाच्या पाळीत ही क्षमता सुमारे 500 पर्यंत वाढेल. हे दुर्गम भागात तैनात केले जाऊ शकते आणि ऑटोमोटिव्ह चेसिसमधून उचलले जाऊ शकते आणि देशातील कोणत्याही ठिकाणी पाठविण्यासाठी मालवाहू ट्रेनमध्ये ठेवता येते. बीएसएल -2 लॅब एनएबीएलच्या वैशिष्ट्यांनुसार आहे आणि डीबीटीच्या प्रमाणित चाचणी केंद्रांशी जोडली जात आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत जैव तंत्रज्ञान विभाग (डीबीटी), कृषी, आरोग्यसेवा, प्राणी विज्ञान, पर्यावरण आणि उद्योग क्षेत्रात जैव तंत्रज्ञानाचा विकास आणि उपयोग यासह जैव तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहन देतो.
एएमटीझेड हे आशियातील पहिले वैद्यकीय उपकरण उत्पादन पर्यावरणातील तंत्रज्ञान आहे, जे केवळ वैद्यकीय तंत्रज्ञानासाठी समर्पित आहे (मेडेटेक) आणि विविध मंत्रालयाद्वारे समर्थित आहे.
संसर्गजन्य रोग निदान प्रयोगशाळा (आय- लॅब)
- ग्रामीण भागातील चाचणीच्या सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोविड-कमांड धोरणा अंतर्गत डीबीटीने एएमटीझेडच्या माध्यमातून मोबाइल चाचणी प्रयोगशाळेच्या उभारणीस पाठिंबा दर्शविला आहे.
- या मोबाइल चाचणी प्रयोगशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे कोविड व्यतिरिक्त इतर संसर्गजन्य रोगांचे निदान करण्याची त्यांची उपयोगिता
विशेष तपशील
- ऑटोमोटिव्ह चेसिस, निदान उपकरण, स्वच्छ खोली, बीएसएल -2 प्रयोगशाळा, जैव-सुरक्षा कॅबिनेट
- प्रत्येक आय-लॅबसाठी दररोज 25 चाचण्या (आरटी-पीसीआर)
- एलिसा चाचणी / दिवस
- टीबी, एचआयव्ही इत्यादींसाठी इतर रोगांची अतिरिक्त चाचणी सीजीएचएस दरांनुसार केली जाईल.
तैनात
- विज्ञान व तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते 18 जून 2020 रोजी नवी दिल्ली येथे पहिली आय- लॅबसाठी सुरू करण्यात आली.
- प्रादेशिक / शहर केंद्रे (हब) यांना या लॅब प्रदान केल्या जातील आणि त्या पुढे त्या दूरदूरच्या भागात तैनात केल्या जातील.
(कृपया व्हिडिओ आणि इतर फोटो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा)
***
S.Thakur/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1632545)
Visitor Counter : 392