विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

देशात नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी सीएसआयआर आणि अटल इनोव्हेशन मिशन यांनी इरादा पत्रावर केल्या स्वाक्षऱ्या

Posted On: 05 JUN 2020 10:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जून 2020


सीएसआयआर ही विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर लक्ष केंद्रित करणारी आणि नाविन्यतापूर्ण उद्योगासाठी प्रोत्साहन देणारी अग्रगण्य संशोधन आणि विकास संस्था आहे. देशाच्या नाविन्यता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सीएसआयआर, अटल इनोवेशन मिशन या सरकारच्या उपक्रमासमवेत काम करणार आहे.

 th[3] 

देशात विविध क्षेत्रात नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी सीएसआयआर आणि अटल इनोव्हेशन मिशन यांनी आज इरादा पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताब कांत, सीएसआयआरचे महासंचालक डॉ शेखर मांदे आणि दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या मध्ये या क्षेत्रांचा समावेश आहे.

अटल नाविन्यता अभियान अंतर्गत, सीएसआयआर इन्क्युबेटरच्या माध्यमातून जागतिक तोडीच्या स्टार्ट अप्सना सहकार्य पुरवणे, सीएसआयआर इनोव्हेशन पार्क उभारण्यासह नव्या उपक्रमावर संयुक्तपणे काम करणे, इ. गोष्टी होऊ शकतील. सीएसआयआर कडे पेटंट, ज्ञान आणि जागतिक दर्जाचे संशोधक यांची भक्कम बाजू असून अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात नाविन्यतेला चालना देणाऱ्या धोरणावर काम करत असून त्यामुळे देशातल्या नाविन्यता विषयक परिसंस्था बळकट व्हायला मदत होणार आहे. 

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगात एआरआयएसईच्या सहकार्याने सीएसआयआरकडून संशोधन आणि नाविन्यतेला चालना. सीएसआयआर, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासमवेत काम करत असून त्यांचे अनेक बाबीमधले तंत्रज्ञान आणि माहिती सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासाठी सहाय्यकारी ठरत आहे. या दोन्हींच्या समन्वयाने देशाच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाना गती देऊन या क्षेत्राचा कायापालट करण्याची क्षमता  त्यांच्यात आहे.

अटल टिंकरिंग प्रयोगशाळा आणि जिज्ञासा यांच्याशी समन्वय राखून भारतातल्या शाळांमधे समस्या सोडवण्यासाठीची मानसिकता घडवणे. अटल टिंकरिंग प्रयोगशाळामार्फत लहानपणीच मुलांच्या मनात उत्सुकता, सर्जनशीलता आणि कल्पकतेची जोपासना करण्यात येत आहे. सीएसआयआरच्या जिज्ञासा या विद्यार्थी आणि विज्ञान यांना जोडणाऱ्या उपक्रमात सुमारे 3 लाख विद्यार्थी सहभागी आहेत. या दोन्हींच्या समन्वयातून विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध होऊन त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्याला चालना मिळणार आहे.

कार्य आराखडा विकसित करून संयुक्त उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येईल. कोणते उपक्रम आणि कामे हाती घेण्यात येणार आहेत याची तपशीलवार माहिती या आराखड्यात राहील.

 

* * *

S.Pophale/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1629856) Visitor Counter : 174


Read this release in: English , Hindi , Tamil