खाण मंत्रालय
कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात कोळसा आणि खाण विभाग सार्वजनिक क्षेत्राचा महत्वाचा सहभाग-प्रल्हाद जोशी
प्रविष्टि तिथि:
20 APR 2020 6:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2020
नॅशनल अॅल्युमिनीयम कंपनी (नाल्को) आणि महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (एमसीएल) या कोल इंडियाच्या उपकंपन्यांनी ओदिशामधील कोविड-19 रुग्णालयांना आवश्यक असलेला संपूर्ण निधी पुरविण्याचे ठरविले आहे.
ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गीक वायू मंत्री धर्मेद्र प्रधान, कोळसा आणि खनिज मंत्री प्रल्हाद जोशी या केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते विडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज या रुग्णालयांचे उद्घाटन झाले.
ओदिशा सरकारने सुरू केलेली ही रुग्णालये राज्यातल्या इतर रुग्णालयांच्या मदतीने चालवली जातील.
“कोळसा आणि खनिज मंत्रालयाची सर्व सार्वजनिक क्षेत्रे कोविड-19 शी लढा देणाऱ्या राज्य सरकारांना शक्य तेवढे सर्वोत्तम सहकार्य करत आहे ही अभिमानाची बाब आहे. कोविड संबधित सर्व सोयी उपलब्ध असणारी ही रुग्णालये ओदिशाच्या नागरीकांना उपयुक्त ठरतील”. असे कोळसा आणि खनिज मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी म्हणाले.
ओदिशातल्या नवरंगपूर जिल्ह्यातील 200 खाटांच्या रुग्णालयाला नाल्को निधी पुरवत आहे, तर अंगूल जिल्ह्यातील तालचेर येथील 150 खाटांच्या रुग्णालयाला महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड निधी पुरवत आहे याशिवाय महानदी कोलफिल्ड्स त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुविधा रुग्णालय उभारण्यासाठी देत आहे. “ राज्यांना आपापल्या जिल्हास्तरावरील खनिज निधीतला 30 टक्के भाग कोविड-19विरोधी लढ्यासाठी वापरता येईल, अश्या प्रकारचे दिशानिर्देश केन्द्र सरकारने याआधीच दिले आहेत. खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या ओदिशासारख्या राज्यांना महामारीशी दोन हात करताना याचा फायदा होईल”, असेही जोशी म्हणाले.
नाल्कोच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे एका दिवसाचे वेतन ओदिशा मुख्यमंत्री रिलीफ फंडात जमा केले आहे. ही रक्कम एकूण 2.5 कोटी रुपये एवढी आहे. महानदी कोलफिल्ड्सने ओदिशा सरकारने सुरू केलेल्या भुवनेश्वर येथील 500- खाटांच्या कोविड-19 रुग्णालयाला निधी दिला आहे, तर झारसुगुडा येथे 50 खाटांचे विलगीकरण केंद्र उभारले आहे. कोळसा खाणींमध्ये तसेच त्या क्षेत्रातील आणि जवळपासच्या वस्तीतील लोकांना मास्क तसेच क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी फॉग कॅननसारखी अत्याधुनिक उपकरणेही ही कंपनी पुरवत आहे.
मुख्य सार्वजनिक क्षेत्रातील नाल्को ही कंपनी खनिकर्म मंत्रालयाच्या अखत्यारीत येते, तर महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड कोळसा मंत्रालयाच्या अखत्यारीतील कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी आहे. भारतातील एकूण खनिज उत्पादनापैकी 32% बॉक्साईट, 33% अल्युमिना, आणि 12% अल्युमिनियम उत्पादनात नाल्कोचा सहभाग आहे. भारतातील एकूण कोळसा उत्पादनापैकी 80% उत्पादन कोल इंडिया घेते.
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
B.Gokhale/V.Sahajrao/P. Kor
(रिलीज़ आईडी: 1616443)
आगंतुक पटल : 238