मंत्रिमंडळ

पशुधन पालन करणाऱ्या शेतक-यांना मदत करण्यासाठी फूट अँड माऊथ डिसीज (एफएमडी) आणि ब्रुसेलोसिस नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची नवीन उपक्रमला मंजुरी


पशुसंवर्धन क्षेत्रातील संबंधित शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार

Posted On: 31 MAY 2019 8:41PM by PIB Mumbai

 

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक अभिनव उपक्रम मंजूर करण्यात आला ज्यामुळे कोट्यवधी शेतक-यांना फायदा होईल आणि प्राण्यांचे आरोग्य सुधारेल.

पशुधन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल मुरुम रोग (एफएमडी) आणि ब्रुसेलोसिस नियंत्रित करण्याशी संबंधित आहे. पुढील पाच वर्षांत पशुधनावर    पडणा-या या रोगांचे पूर्ण नियंत्रण करण्यासाठी  तसेच या रोगांचे निर्मूलन करण्यासाठी मंत्रिमंडळाने एकूण 13,343 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

हा निर्णय आपल्या मूक जनावरांप्रति भूतदयेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

फूट अँड माऊथ  डिसीज (एफएमडी) आणि ब्रुसेलोसिसचा धोका:

पशुधन - गाय-बैल, म्हशी, मेंढी, शेळ्या, डुकरे इत्यादींमध्ये हे रोग सामान्यपणे आढळून येतात.

जर गाय / म्हशी एफएमडीने संक्रमित झाल्यास दुधाचे नुकसान 100% पर्यंत असू शकते , जे चार ते सहा महिने टिकू शकते. तर ब्रुसेलोसिसच्या बाबतीत, संपूर्ण जीवन चक्र दरम्यान दूध उत्पादन 30% ने कमी होते. ब्रुसेलोसिस देखील प्राण्यांमध्ये वंध्यत्व निर्माण करते. ब्रुसेलोसिसचे संक्रमण शेतमजुर आणि पशुधन मालकांना देखील होऊ शकते.  दोन्ही रोगांचा दूध व्यापार आणि इतर पशुधन उत्पादनांवर थेट नकारात्मक प्रभाव पडतो.

मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीरनाम्यात दिलेले मोठे आश्वासन  पूर्ण करते . पशुधन बाळगणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

जनावरांची काळजी आणि सहानुभूती :

   एफएमडीच्या बाबतीत, या योजनेमध्ये बोवाइन वासरांना प्राथमिक लसीकरण तर  सहा महिन्यांच्या अंतराने 30 कोटी बोवाइन (गायी-बैल आणि म्हशी) आणि 20 कोटी मेंढी व 1 कोटी डुकरांचे लसीकरण केले जाणार आहे.  ब्रुसेलोसिस नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत 3.6 कोटी गाई वासराचे  100 टक्के लसीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारांच्या दरम्यान खर्च वाटून घेण्याच्या आधारावर हा कार्यक्रम लागू केला गेला आहे.मात्र आता या रोगांचे संपूर्ण उन्मूलन करण्यासाठी आणि देशातल्या सर्व पशुधनधारक शेतकऱ्यांना उपजीविकेची संधी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने आता संपूर्ण खर्च स्वतः करण्याचा निर्णय घेतला आहे.

***

Dhananjay Wankhede - PIB Nagpur / Sushama Kane(Release ID: 1573053) Visitor Counter : 145