मंत्रिमंडळ

सार्वत्रिक निवडणुका, २०१९ नंतर संसदेचे अधिवेशन सुरु करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


१७ जून -२६ जुलै दरम्यान लोकसभेचे अधिवेशन

२० जून-२६ जुलै दरम्यान राज्यसभेचे अधिवेशन

४ जुलै रोजी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार

५ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार

Posted On: 31 MAY 2019 8:35PM by PIB Mumbai

31  मे 2019 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत १७ जून रोजी १७ व्या लोकसभेचे अधिवेशन सुरु करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. २६ जुलै २०१९ पर्यंत हे अधिवेशन चालेल.

राज्यसभेचे अधिवेशन २० जून २०१९ ते २६ जुलै २०१९ या कालावधीत होईल.

सभापतीपदासाठी निवडणूक बुधवार १९ जून २०१९ रोजी होईल.

राज्य घटनेच्या कलम ८७ (१) नुसार राष्ट्रपतींना २० जून २०१९ रोजी सकाळी ११ वाजता संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात दोन्ही सदनांना संबोधित करण्यासाठी विनंती केली जाईल.

शुक्रवार दि. ५ जुलै २०१९ रोजी २०१९-२० वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर संबंधित सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात येईल.

***

Dhananjay Wankhede - PIB Nagpur / Sushama Kane


(Release ID: 1573045) अभ्यागत कक्ष : 251