मंत्रिमंडळ

पंजाबमधील रावी नदीवरील शाहपुरकंडी धरणाच्या (राष्ट्रीय प्रकल्प) अंमलबजावणीस मंत्रिमंडळ मंजूरी

प्रविष्टि तिथि: 06 DEC 2018 9:16PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने, पंजाबच्या रावि नदीवरील शाहपूर कंडी धरणप्रकल्प  कार्यान्वयनासमंजुरी दिली आहे. या सिंचन घटकांसाठी लागणारे केंद्रीय अर्थसहाय्य,  488.38 कोटी रुपये  वर्ष  2018 -19 ते 2022-23  या  पाच वर्षांच्या कालावधीत  प्रदान केले जाईल.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे  रावी नदीच्या पाण्याची होणारी नासाडी थांबण्यास मदत मिळणार  आहे. सध्या हे पाणी  माधोपुर हेडवर्क्सच्यावाहतूकमार्गेपाकिस्तानकडे जाते.

तपशीलः

  • प्रकल्पाच्या पूर्णते नंतर पंजाबची 5000 हेक्टर सिंचन क्षमता आणि जम्मू-काश्मीरची 32,173 हेक्टर सिंचन क्षमता वाढणार आहे.
  • शाहपुरकांडी धरण प्रकल्पांना केंद्रीय सहाय्यासाठी नाबार्डद्वारे निधी  देण्यात  येणार असून,हा निधी सध्या एलटीआयएफ अंतर्गत, 99पीएमकेवाईवाय-एआयबीपी प्रकल्पांसाठीही  देण्यात येतो.  
  • हा प्रकल्प पंजाब सरकारद्वारेकार्यान्वित होणार असून, केंद्राचे 485.38 कोटी रुपयांचेअर्थसहाय्य  या प्रकल्पाला मिळणार आहे. या  प्रकल्पाचे काम जून 2022 पर्यंत पूर्ण होईल.

                                                                          *****

 

B. Gokhale


(रिलीज़ आईडी: 1555032) आगंतुक पटल : 143
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Bengali , Assamese , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam