गृह मंत्रालय

महिलांची सुरक्षा बळकट करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुरु केली दोन पोर्टल्स


महिला आणि बालकांविरोधात सायबर गुन्हे प्रतिबंध पोर्टल आक्षेपार्ह ऑनलाईन मजकुराला आळा घालेल

लैंगिक गुन्हेगारांचा राष्ट्रीय डेटाबेस लैंगिक अपराधांवर देखरेख आणि तपास करण्यात मदत करेल

Posted On: 20 SEP 2018 5:37PM by PIB Mumbai

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी दोन वेगवेगळी पोर्टल्स सुरु केली. “cybercrime.gov.in” या पोर्टलवर लहान मुलांच्या लैंगिक शोषण , बलात्कार आणि सामूहिक बलात्कारासंबंधी ऑनलाईन आक्षेपार्ह मजकुराबाबत नागरिकांकडून तक्रारी स्वीकारण्यात येतील. यात तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाईल.


लैंगिक गुन्हेगारांसंबंधी राष्ट्रीय डेटाबेस (एनडीएसओ ) केवळ कायदा अंमलबजावणी संस्थांना वापरता येईल. यामुळे लैंगिक अपराधांचा शोध आणि तपास यात मदत होईल.


व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांमधील अधिकाऱ्यांना संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की महिला आणि लहान मुलांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. आज सुरु करण्यात आलेली दोन पोर्टल्स महिला आणि बालकांची सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग आहे. या दोन्ही पोर्टल्सचा पूर्ण क्षमतेने वापर करून नियमितपणे माहिती अद्ययावत करावी असे आवाहन त्यांनी केले.


यावेळी बोलताना महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी कायद्याचे पालन करणाऱ्या संस्थांना आश्रमात राहणाऱ्या मुलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. लैंगिक गुन्ह्यांचा त्वरित तपास करण्यासाठी पोलीस स्थानकात फॉरेन्सिक किटची तरतूद करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

***

Nitin Sapre  / Sushama Kane



(Release ID: 1546900) Visitor Counter : 200


Read this release in: English , Tamil , Malayalam