पंतप्रधान कार्यालय

अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पॉम्पीयो यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 06 SEP 2018 7:50PM by PIB Mumbai

अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पॉम्पीयो यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातर्फे त्यांनी पंतप्रधानांना सदिच्छा दिल्या. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या संवादाच्या आठवणींना पंतप्रधानांनी या वेळी उजाळा दिला आणि ट्रम्प यांना सदिच्छा कळविण्याची विनंती, मंत्री महोदयांना केली. 

आज झालेला 2+2 संवाद उपयुक्त आणि फलदायी ठरल्याचे सांगत मंत्रीमहोदयांनी त्याबद्दल  पंतप्रधानांना माहिती दिली. दोन्ही देशांमध्ये हा संवाद घडवून आणल्याबद्दल पंतप्रधानांनी दोन्ही मंत्री तसेच भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि संरक्षण मंत्री यांचे अभिनंदन केले.

S.Tupe/M.Pange/



(Release ID: 1545269) Visitor Counter : 87