Posted On:
29 NOV 2026 3:26PM by PIB Mumbai
महिला शक्तीचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठीचा संघर्ष दशकांपासून सुरूच आहे, त्याचवेळी हे प्रत्यक्षात घडावे यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करणाऱ्यांमध्ये आपणही सहभागी आहोत अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
महिला सक्षमीकरणाचा आपला संकल्प अतूट आहे आणि राष्ट्राचे हित हेच आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमावर आहे असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. ज्यावेळी काही मोजक्या पक्षांचे हितसंबंध राष्ट्रहितापेक्षा मोठे ठरू लागतात, त्यावेळी त्याचे परिणाम महिला शक्तीला आणि राष्ट्रहिताला भोगावे लागतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
नारी शक्ती वंदन अधिनियमातील सुधारणा ही काळाची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. देशाच्या निम्म्या लोकसंख्येच्या स्वप्नांसाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा आपला हा दृढ संकल्प असून, तो पूर्णत्वाला नेला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
यासंदर्भात X या समाजमाध्यमावर पंतप्रधानांनी सामायिक केलेला व्हिडिओ संदेश -
भारताची प्रगती, महिला शक्तीच्या स्वप्नांची झेप...
***
राधिका अघोर/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai