57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

‘मेड इन इंडिया: ए टायटन स्टोरी’ या वेब सिरीजने 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात  ‘इफ्फी’च्या  समारोप समारंभात जिंकला सर्वोत्तम वेब सिरीज (OTT) पुरस्कार

Posted On: 28 NOV 2026 7:33PMby PIB MumbaiRelease ID: 2343229Views: 13

 

पणजी – 28 नोव्हेंबर, 2026

गोव्यात पार पडलेल्या 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) आज संध्याकाळी झालेल्या दिमाखदार सांगता सोहळ्यात, हिन्दी माहितीपट-नाट्य मालिका ‘मेड इन इंडिया: ए टायटन स्टोरी’ या वेब सिरीजला 2026 ची  ‘सर्वोत्कृष्ट वेब सिरिज (OTT)’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित, प्रभलीन सिंधु यांची संकल्पना आणि ओलमाइटी मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेल्या या मालिकेने, परीक्षक मंडळाने निवड केलेल्या, विविध पाच  भारतीय भाषांतील मालिकांना मागे टाकत बाजी मारली. परीक्षक मंडळाने निवड केलेल्या पांच मालिकांमध्ये मराठी मालिका – देवखेळ (दिग्दर्शक – चंद्रकांत लता गायकवाड), हिंदीतील मुसाफीर कॅफे (दिग्दर्शक – रुचिर अरुण), तेलुगू मालिका – मयसभा (दिग्दर्शक – देव कट्टा) आणि हिंदीतीलच आदर्श बाल विद्यालय (दिग्दर्शक हिमांशु गौर) यांचा समावेश होता.

परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आणि या चित्रपट महोत्सवाचे आयोजक  जमनादास मजेठिया यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. परीक्षक मंडळ आणि त्यातील  अन्य सदस्यांच्या वतीने बोलताना मजेठिया यांनी, मालिकेची निवड करताना करण्यात आलेल्या कठोर निकष प्रक्रियेवर भाष्य केलं. यावर्षी प्राप्त झालेल्या  46 ओटीटी मालिकांच्या प्रवेशिकांमधून सुरुवातीला 12 प्रवेशिका निवडण्यात आल्या, त्यानंतर अंतिम नामांकनासाठी पांच मालिकांची निवड करण्यात आली आणि सरतेशेवटी एका विजेत्या मालिकेची निवड करण्यात आली असं त्यांनी सांगितलं. हा निर्णय घेताना ठेवण्यात आलेल्या कडक निकषाबद्दल बोलताना ते म्हणाले, खऱ्या अर्थाने भारतीयांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या, राष्ट्रभावना जागृत करणाऱ्या आणि प्रेक्षकांना प्रेरणा देतील, अशा वेब सिरिजचा  परीक्षकांनी शोध घेतला. वेब सिरिज आता भारतीयांच्या रोजच्या जीवनाचा भाग झाल्या असून कुटुंब एकत्र बसून त्यांचा आनंद घेऊ शकतात हे त्यांनी नमूद केले. विविध भाषांमधील पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या कलाकृतींच्या वैविध्यपूर्ण मालिकांचे त्यांनी  कौतुक केले.

डिजिटल कथाकथनाच्या वेगाने विस्तारत असलेल्या क्षेत्राची दखल घेण्यासाठी, 2023 मध्ये 54 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा पुरस्कार सुरु करण्यात आला. प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपये रोख असे स्वरूप असलेला हा पुरस्कार दिग्दर्शक, क्रिएटर आणि निर्माता यांच्यात विभागून दिला जातो. आपल्या अधिकृत प्रशस्तिपत्रात, निवड समितीने स्थानिक उद्योगावर प्रकाश टाकल्याबद्दल विजेत्या मालिकेची प्रशंसा केली. यात म्हटले आहे: यशाच्या कथा सांगायला हव्यात आणि आणि त्याचा उत्सव साजरा व्हायला हवा.

औद्योगिक यश हे विशेषतः उद्यमशीलता, चिकाटी आणि दूरदृष्टीची प्रखर जाणीव निर्माण करते. ही मालिका ती भावना अतिशय सुंदर रीतीने जपते, आणि भारतात पूर्ण झालेली स्वप्न आणि आकांक्षांच्या कथांचा मार्ग मोकळा करतो. या कथा अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात, म्हणूनच त्या पहायला, शेअर करायला आणि साजऱ्या करायला हव्यात. 

जून 2026 मध्ये ॲमेझॉन एमएक्स प्लेयर वर प्रदर्शित झालेली 'मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी' ही सहा भागांची हिंदी डॉक्युड्रामा मालिका असून, ती भारतातील सर्वात प्रतिष्ठित ग्राहक ब्रँडपैकी एका ब्रँडच्या उदयाचा प्रवास सांगते. विनय कामथ यांच्या 'टायटन: इनसाइड इंडियाज मोस्ट सक्सेसफुल कन्झ्युमर ब्रँड' या पुस्तकावर आधारित या मालिकेत, जिम सर्भ यांनी झर्क्सीस देसाई आणि नसीरुद्दीन शाह यांनी जे. आर. डी. टाटा यांच्या भूमिकेत प्रशंसनीय अभिनय केला. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार प्रदान सोहळा, हा 57 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरला, आणि याबरोबरच जागतिक चित्रपट, सर्जनशील देवाणघेवाण आणि कलात्मक उत्कृष्टतेचा नऊ दिवसांचा हा सोहळा संपन्न झाला.

अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहावी:

https://www.youtube.com/live/sW-Iw25eOGs

***

राधिका अघोर/माधुरी पांगे/सविता म्हसकर/राजश्री आगाशे/परशुराम कोर


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2343229
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026