Posted On:
27 NOV 2026 9:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2026
आयओआरए (IORA - इंडियन ओशन रिम असोसिएशन) या हिंदी महासागर क्षेत्रीय संघटना मंत्रिपरिषदेच्या 25 व्या बैठकीत सहभागी होण्यासाठी नवी दिल्ली येथे आलेल्या 23 आयओआरए (IORA) सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आणि प्रतिनिधीमंडळ प्रमुखांची पंतप्रधानांनी आज भेट घेतली.
हिंदी महासागरामुळे हजारो वर्षांपासून भारत आणि या क्षेत्रातील देशांमध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध निर्माण झाले आहेत. या संबंधांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, आयओआरएचे (IORA) अध्यक्ष या नात्याने सर्व सदस्य देशांसोबत जवळून काम करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. हिंदी महासागर क्षेत्रातील शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य मजबूत करण्यासह सामायिक समृद्धी साधण्यासाठी भारत, ‘महासागर’ (MAHASAGAR – म्युच्युअल अँड होलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रीजन्स) हा, विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर सहकार्याने सर्वांगीण प्रगतीचा दृष्टिकोन पुढे नेण्यास उत्सुक आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी 'एक्स' समाजमाध्यमावर वर टिप्पणी करताना म्हटले:
"नवी दिल्ली येथे आयओआरए मंत्रिपरिषदेच्या 25 व्या बैठकीत सहभागी होणाऱ्या 23 सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना आणि प्रतिनिधीमंडळ प्रमुखांना भेटून अत्यंत आनंद झाला.
हिंदी महासागराने आपल्या जनतेला हजारो वर्षांपासून एकत्र जोडलेले आहे. आयओआरएचे (IORA) अध्यक्ष या नात्याने, आपला 'महासागर' (MAHASAGAR - म्युच्युअल अँड होलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रीजन्स) दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी आणि हिंदी महासागर क्षेत्रातील शांतता, सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धी बळकट करण्यासाठी भारत सर्व भागीदारांसोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे.
@IORAofficial"
माधुरी पांगे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai