विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पोलादाच्या कचऱ्यापासून रस्तेबांधणी तंत्रज्ञान आणि इकोफिक्स तंत्रज्ञानाचा विकास केल्याबद्दल सीएसआयआर-सीआरआरआय संस्थेला प्रतिष्ठेचा सीआयआय 4 आर पुरस्कार; कचऱ्यापासून उत्पादन निर्मिती क्षेत्रातील भारतातील आघाडीच्या 30 उपक्रमांमध्ये गणना

Posted On: 27 NOV 2026 6:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2026

सीएसआयआर-केंद्रिय रस्ते संशोधन संस्था (सीएसआयआर-सीआरआरआय) या नवी दिल्लीतील संस्थेला “संशोधन संस्था / शैक्षणिक संस्थेद्वारे कच-याचे  शाश्वत व्यवस्थापन करण्‍यासाठी नावीन्यपूर्ण पर्यायांमध्ये सर्वोत्कृष्टता” या श्रेणीमध्ये प्रतिष्ठेचा सीआयआय 4 आर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संस्थेला पोलाद कचऱ्यापासून रस्ते तंत्रज्ञान विकास आणि  इकोफिक्स – लोखंड-पोलादाच्या कचऱ्यापासून  खड्डे त्‍वरित दुरुस्तीसाठी वापरता येणारे मिश्रण विकसित केल्याबद्दल भारतातील आघाडीच्या 30 कचरा ते उत्पादन संस्थांच्या यादीत स्थान मिळाले आहे. इकोफिक्स टिकाऊ रस्ते बांधकाम आणि  व्यवस्थापनासाठी पोलाद उद्योगामध्ये वाया जाणाऱ्या पोलादापासून मूल्यवान पदार्थ निर्माण करण्याचे काम करते.

26 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्लीतील हॉटेल ललितमध्ये झालेल्या ‘कचरा ते उत्पादन तंत्रज्ञान’ याविषयीच्या 11 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या परिषदेदरम्यान आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये सीएसआयआर-सीआरआरआय संस्थेने पोलाद कचऱ्यापासून रस्ते तंत्रज्ञान वापरुन गुजरातमध्ये सुरत येथील हजारिया येथे बांधलेल्या जगातील पहिल्या रस्त्याचे प्रारुप सादर केले. यामध्ये शास्त्रीयदृष्ट्या प्रक्रिया केलेला पोलाद कचरा उपयोगात आणला गेला आहे.  

प्रदर्शनातील या प्रारुपाने पोलाद उद्योगातील कचऱ्याचा रस्ते बांधकामामध्ये प्रथमच करण्यात आलेला उपयोग अधोरेखित केला आणि देशांतर्गत संशोधन आणि  तंत्रज्ञानाच्या नवोन्मेषातून औद्योगिक क्षेत्रातील कचऱ्यापासून मूल्यवान बांधकाम साहित्य कसे तयार केले जाऊ शकते हे दाखवून दिले.

सीएसआयआर-सीआरआरआय संस्थेविषयी

नवी दिल्ली येथील सीएसआयआर-केंद्रिय रस्ते संशोधन संस्था (सीएसआयआर-सीआरआरआय) केंद्रिय विज्ञान आणि  तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेची (सीएसआयआर) प्रयोगशाळा आहे. ही संस्था रस्ते व वाहतूक अभियांत्रिकी व संलग्न क्षेत्रातील संशोधन व विकासाचे काम करते. वैज्ञानिक संशोधन, नवोन्मेष व तंत्रज्ञानविषयक प्रगती याद्वारे सुरक्षित, टिकाऊ, कार्यक्षम व लवचिक पायाभूत सुविधा उभारणीमध्ये योगदान देण्याचे काम ही संस्था करते. 


सुवर्णा बेडेकर/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2342740) अभ्यागत कक्ष : 7
Read this releasein: English , Urdu