Posted On:
26 NOV 2026 4:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2026
सामाजिक न्याय आणि विकसित भारतासाठी आपले संविधान कशा प्रकारे कालातीत दिशादर्शकाचे काम करत आहे हे अधोरेखित करणारा, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लिहिलेला लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे.
मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि महिला यांच्यासाठी असलेल्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करत,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतासाठी जे स्वप्न बघितले होते ते साकार करण्यासाठी आपल्या देशाला प्रगतीपथावर नेणारे कल्याणकारी उपक्रम आणि महत्त्वपूर्ण संविधानात्मक तरतुदी ठळकपणे मांडत केंद्रीय राज्यमंत्री मेघवाल यांनी, राष्ट्र-उभारणीत संविधानात्मक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे:
“सामाजिक न्याय आणि विकसित भारतासाठी आपले संविधान कालातीत दिशादर्शक ठरत आहे.
केंद्रीय राज्यमंत्री @arjunrammeghwal यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची जी कल्पना केली होती ती साकार करण्यासाठी आपल्या देशाला प्रगतीपथावर नेणारे कल्याणकारी उपक्रम आणि महत्त्वपूर्ण संविधानात्मक तरतुदी यांच्याबद्दल लिहिले आहे. त्यांनी मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि महिला यांच्यासाठी असलेल्या उपाययोजना त्यांनी अधोरेखित केल्या आहेत. तसेच त्यांनी राष्ट्र-उभारणीत संविधानात्मक मूल्यांचे महत्त्वही अधोरेखित केले.
निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai