Posted On:
24 NOV 2026 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2026
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या (DAF) वतीने गुरुवार, 26 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात (DAIC) संविधान दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
“संविधान @76 : डॉ.बी.आर.आंबेडकर यांचा संवैधानिक दृष्टिकोन आणि भारतीय लोकशाहीचे भविष्य” ही या सोहळ्याची संकल्पना आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री तसेच डॉ.आंबेडकर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. वीरेंद्र कुमार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि बी. एल. वर्मा हे देखील उपस्थितांना संबोधित करतील. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव सुधांश पंत हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांच्या हस्ते संविधानाच्या उद्देशिकेचे (प्रास्ताविका) वाचन हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असेल.
न्यायमूर्ती लळीत हे “संवैधानिक सुशासन आणि डॉ. बी. आर. आंबेडकर यांचा वारसा” या विषयावर संविधान दिन व्याख्यान देखील देतील.
या सोहळ्याच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये संविधानाविषयीची समज अधिक दृढ करणे आणि डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि आदर्श यांचा प्रसार करण्याची आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित करणे, हा डॉ. आंबेडकर फाउंडेशनचा उद्देश आहे. संविधानावर आधारित लोकशाही, समता, प्रतिष्ठा, बंधुता आणि सामाजिक समावेश या विषयांवर संवाद घडवून आणणे, तसेच न्याय्य, सक्षम आणि सर्वसमावेशक भारताची संकल्पना अधिक बळकट करणे हे देखील उद्दिष्ट आहे.
नितीन फुल्लुके /आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai