पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

फलनिष्पत्तींची यादी - नेपाळच्या पंतप्रधानांचा भारतात राजनैतिक दौरा

Posted On: 23 NOV 2026 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 नोव्‍हेंबर 2026

 

उद्घाटने / पायाभरणी / प्रकल्पांचे लोकार्पण:

  • अयोध्या आणि जनकपूर दरम्यान सरयू–कमला एक्सप्रेस रेल्वे सेवेचा आरंभ.
  • बनबसा इथे नवीन एकात्मिक तपासणी चौकी - आयसीपीची पायाभरणी तसेच भैरहवा, सुनौली आणि दोधारा-चांदनी इथल्या आयसीपीच्या बांधकामातील प्रगती.
  • भारतातील धार्चुला आणि नेपाळमधील दार्चुला यांना जोडणाऱ्या नव्या सीमापार वाहनवाहतुकीयोग्य पुलाचे उद्घाटन.
  • 669 मेगावॅट क्षमतेच्या लोअर अरुण जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी.
  • मोतिहारी–अमलेखगंज तेल वाहिनीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण.
  • नियोजित सिलीगुडी–झापा पेट्रोलियम वाहिनी प्रकल्पांतर्गत झापा इथे पेट्रोलियम टर्मिनलची पायाभरणी.

घोषणा:

  • नेपाळची पुनर्बांधणी आणि दीर्घकालीन विकासाला सहाय्य करण्यासाठी 15,000 कोटी रुपये (24,000 कोटी नेपाळी रुपये) विकास सहकार्य पॅकेज.
  • नेपाळच्या सीमापार मालवाहतुकीसाठी भारतातील आणखी काही बंदरांचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे — दीनदयाल बंदर (कांडला, गुजरात) आणि पारादीप बंदर (ओदिशा).
  • नेपाळमधील चितवन इथे कृषी-औद्योगिक वसाहतीची स्थापना करणे.
  • नेपाळमध्ये आयआयटीचे, परदेशातील शाखा संकुल स्थापन करणे.
  • प्रस्तावित रक्सौल–काठमांडू विद्युतीकृत ब्रॉड गेज रेल्वे मार्गासाठीचे स्थळ निश्चिती सर्वेक्षण पूर्ण करणे.

सामंजस्य करार:

  • गुजरातमधील गांधीनगर स्थित राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ (एनएफएसयू) आणि नेपाळ पोलीस दलाचा गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांच्यात शैक्षणिक आणि संशोधन सहकार्यासाठी सामंजस्य करार.
  • भारतातील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ (आरआरयू) आणि नेपाळची राष्ट्रीय पोलीस अकादमी (एनपीए) यांच्यात सामंजस्य करार.
  • भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागांतर्गत कार्यरत सुशासनासाठी राष्ट्रीय केंद्र (एनसीजीसी) आणि नेपाळ सरकारच्या संघराज्य व्यवहार व सामान्य प्रशासन मंत्रालयाचे नेपाळ प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालय (एनएएससी) यांच्यात नेपाळमधील नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासंदर्भात सामंजस्य करार.
  • आयुर्वेद आणि औषधोपचारांच्या इतर पारंपरिक पद्धतींच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत सरकार आणि नेपाळ सरकार यांच्यात सामंजस्य करार.
  • दक्षिण आशिया उपग्रहाच्या वापरासाठी उपग्रह संचार जाळे – सॅटकॉम नेटवर्क उभारण्यासंदर्भात भारत सरकारची इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि नेपाळ सरकारचे माहिती व दळणवळण मंत्रालय (एमओआयसी) यांच्यात सामंजस्य करार.
  • शाश्वत शहरी विकासाच्या क्षेत्रात तांत्रिक सहकार्यासाठी भारत सरकार आणि नेपाळ सरकार यांच्यात सामंजस्य करार.
  • आरोग्य आणि वैद्यक क्षेत्रातील सहकार्यासाठी भारताचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि नेपाळचे आरोग्य व अन्न सुरक्षा मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार.
  • पशुधन आणि मत्स्य व्यवसाय विकास क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि नेपाळ यांच्यात सामंजस्य करार.

 

* * *

राधिका अघोर/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2340735) अभ्यागत कक्ष : 6