राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बल्गेरियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Posted On: 20 NOV 2026 10:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2026

बल्गेरिया प्रजासत्ताकाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री वेलिस्लावा पेट्रोवा-चामोवा यांनी आज (20 नोव्हेंबर, 2026) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

राष्ट्रपती भवनात बल्गेरियाच्या परराष्ट्र मंत्री पेट्रोवा-चामोवा आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाचे स्वागत करताना राष्ट्रपतींनी विश्वास व्यक्त केला की, 17 वर्षांनंतर बल्गेरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचा होत असलेला हा पहिलाच भारत दौरा भारत-बल्गेरिया भागीदारीला नवी गती देईल.

व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, वाहतूक आणि दळणवळण तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण आणि दोन्ही देशांतील जनतेमधील परस्पर संबंध अशा विविध क्षेत्रांत भारत आणि बल्गेरियामधील सहकार्य सातत्याने वाढत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराच्या अंमलबजावणीमुळे व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी नव्या आणि महत्त्वपूर्ण संधी निर्माण झाल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याच्या आवश्यकतेसह, विविध बहुपक्षीय व्यासपीठांवर बल्गेरियाने भारताला सातत्याने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि केलेल्या सहकार्याबद्दल राष्ट्रपतींनी प्रशंसा केली.

 

निलीमा चितळे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2339399) अभ्यागत कक्ष : 7