57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

लेन्सच्या माध्यमातून दिसणारी दृश्ये: 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी पणजीतील विविध मार्ग आणि कार्यक्रम स्थळांवर जोरात तयारी


प्रकाशमान कमानी स्वागत द्वारे आणि सुवर्ण मयुरांनी पणजी झाली 57 व्या इफ्फीसाठी सज्ज

Posted On: 19 NOV 2026 6:41PMby PIB MumbaiRelease ID: 2338777Views: 6

गोवा, 19 नोव्‍हेंबर 2026

 

पणजी परिसरात 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीवर शेवटचा हात फिरवला जात असतानाच, या महोत्सवाचे यजमानपद भूषवण्यासाठी गोवा सज्ज झाला आहे. उत्सवाचा मुख्य परिसर आणि पणजी शहरात कारागीर आणि कार्यक्रम आयोजन पथके संकल्पनात्मक संरचना, प्रतिनिधींच्या फिरण्याच्या मार्गावर  उभारलेले चित्रपटांच्या रिळांच्या आकाराचे बोगदे, प्रतिनिधींसाठी माहिती देणारे किऑस्क तसेच यावर्षीच्या महोत्सवासाठी निवडलेली ‘सीमा नसलेल्या कथा’ ही संकल्पना साजरी करणाऱ्या उत्सवी कमानी महोत्सवाच्या  जय्यत तयारीची खात्री करून देत आहेत.

गोव्याची राजधानी म्हणून ख्यातनाम असलेली पणजी नगरी आता 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी)चित्रपट आणि संस्कृतीच्या एका चमकदार केंद्रात रुपांतरीत झाली आहे. ईएसजी संकुल, कला अकादमी यांसह महोत्सवाची प्रमुख कार्यक्रमस्थळे आणि पणजीच्या आसपासचा परिसर आपल्या देशाच्या समृद्ध चित्रपटीय वारशाचे दर्शन घडवणाऱ्या भव्य संकल्पनात्मक संरचनांनी सजला आहे.

57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) मुख्य कार्यक्रमस्थळी प्रवेशद्वारावर मोराच्या संकल्पनेवर आधारलेली एक अतिभव्य कमान उभारण्यात आली आहे.

 

रंगीबेरंगी भौमितिक नक्षीकाम असलेल्या पार्श्वभूमीवर 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) बोधचिन्हाचे दिवसभर दर्शन घडवणारी एक आकर्षक मांडणी गोव्यात पणजी येथे अभ्यागतांच्या स्वागतासाठी उभी आहे.

 

गोव्यात पणजी येथे उभारलेल्या 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांच्या अधिकृत वळणदार रचनेमध्ये लावलेली चित्रपटांची पोस्टर्स चित्रपटांच्या वैविध्यपूर्ण विश्वाचा उत्सव साजरा करत आहेत.

 

57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी 2026)उद्घाटन तोंडावर आलेले असताना महोत्सवाशी संबंधित संरचना आणि रंगीत नक्षीकाम यांनी सजलेल्या वाहतूक बेटाचे विस्तृत दृश्य 

 

गोव्यात पणजी येथे महोत्सवाच्या ठिकाणी, वृक्षांनी वेढलेल्या मार्गालगत 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) अधिकृत ब्रँडींग दर्शवणारी प्रतिनिधी नोंदणी केंद्रे तसेच माहिती देणारी किऑस्क

 

57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) तयारी शेवटच्या टप्प्यात आलेली असताना कार्यक्रम परिसरात फिरण्यासाठी उभारलेल्या चित्रपटांच्या रिळांच्या आकाराच्या बोगद्यांमध्ये कार्यक्रमाची तयारी करणारे कर्मचारी सदस्य चित्रपटांची पोस्टर्स लावत आहेत. 

 

57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी 2026) उद्घाटनाआधी गोव्यात पणजी येथे सुशोभित वाहतूक बेटापाशी उभारलेली महोत्सवाशी संबंधित रचना

 

कार्यक्रमाच्या ठिकाणी, रंगीबेरंगी मोरपिसांचे नक्षीकाम असलेले, भव्य, प्रकाशमान प्रवेशद्वार आणि छतावरून खाली सोडलेले आकर्षक पडदे, येथे येणाऱ्या प्रतिनिधींचे आणि चित्रपट रसिकांचे स्वागत करत आहेत.

 

प्रकाशमान ऐतिहासिक वारसा वास्तूच्या मधोमध इफ्फीचे अनोखे सुवर्ण मयूर बोधचिन्ह असलेला तेजस्वी ‘57’ हा क्रमांक ठळकपणे दर्शवणारी रचना बसवण्यात आली असून 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गोव्यात पणजी येथील कार्यक्रम परिसर उंचावरून खाली सोडण्यात आलेल्या दिव्यांच्या माळांनी उजळून गेला आहे.

 

गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीसाठी लावलेल्या मंद दिव्यांच्या छत्र्या आणि 57व्या इफ्फी चे अधिकृत फलक यांनी पणजीतील वृक्षांनी वेढलेल्या रस्त्यांचे रुपांतर एका झळाळत्या मार्गिकेमध्ये केले आहे.

 

पणजी शहरात 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाच्या तयारीने वेग घेतलेला असताना चमकदार एलईडी प्रकाशयोजना आणि मोराच्या संकल्पनेने सुशोभित केलेले सूचनाफलक पणजीत मांडोवी नदीकाठालगतच्या रस्त्यांना उजळून टाकत आहेत.

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/संजना चिटणीस/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2338777
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026