Posted On:
19 NOV 2026 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2026
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पुणे येथे, जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागांतर्गत, 'राष्ट्रीय जल मिशन' (एनडब्ल्यूएम) द्वारे, महाराष्ट्र शासनाच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या ‘जलसंचय जन भागीदारी: कॅच द रेन 2026’ या विषयावरील उच्चस्तरीय आढावा बैठकीत भाग घेतला.
जल शक्ती मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागांमधील 300 हून अधिक अधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतला. आढावा बैठकीत महसूल आणि वन, जलसंपदा, ग्रामविकास, कृषी, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा आणि स्वच्छता आणि मृदा आणि जलसंधारण यासह, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA), विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्रभरातील इतर वरिष्ठ जिल्हा-स्तरीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जेएसजेबी: सीटीआर- 2026 च्या प्रगतीचा आढावा घेण्यावर, आणि राज्यभरात जलसंधारण, पर्जन्यजल संचयन आणि भूजल पुनर्भरण यासाठी समन्वित प्रयत्न बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक भाषणानंतर 'नॅशनल वॉटर मिशन'द्वारे 'जेएसजेबी'च्या पार्श्वभूमीविषयक सादरीकरणाने झाली. यामध्ये या उपक्रमाची उद्दिष्टे आणि महत्त्व, तसेच जलसंधारणामध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज यावर प्रकाश टाकण्यात आला.
'जेएसजेबी: सीटीआर-2026, 'जल जीवन मिशन' आणि 'स्वच्छ भारत मिशन'शी संबंधित विषयांवर जिल्हा दंडाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि विभागीय वन अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. या संवादामुळे जिल्हास्तरीय अंमलबजावणीचे पुनरावलोकन करण्याची, आव्हानांवर चर्चा करण्याची आणि संबंधित विभाग आणि क्षेत्रीय प्राधिकरणांमधील समन्वय मजबूत करण्याची संधी मिळाली.
बैठकीदरम्यान, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता विभागाच्या सचिवांनी जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन च्या प्रगतीवर सादरीकरणे केली. सादरीकरणांमध्ये या प्रमुख कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येणारे उपक्रम आणि झालेली प्रगती यांची माहिती देण्यात आली, तसेच राज्य आणि जिल्हा स्तरावर समन्वित अंमलबजावणीच्या महत्त्वावर भर देण्यात आला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात जलसंवर्धनाच्या प्रयत्नांना बळकटी देण्याची आणि महाराष्ट्राभर 'जेएसजेबी: सीटीआर-2026 ची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या राज्य सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला. त्यांनी पाणीविषयक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक सहभाग आणि समन्वित कृतीचे महत्त्व अधोरेखित केले आणि हे उद्दिष्ट निर्धारित कालमर्यादेत पूर्ण केले जाईल, अशी खात्री दिली.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटिल यांनी समारोपाच्या भाषणात, जलसंवर्धन, भूजल पुनर्भरण आणि लोकसहभागासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. जल सुरक्षा बळकट करण्यासाठी आणि शाश्वत जल व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी जेएसजेबी: सीटीआर-2026 ची प्रभावी अंमलबजावणी आणि इतर प्रमुख कार्यक्रमांशी समन्वय साधण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
या बैठकीत महाराष्ट्रभर जलसंधारणाची उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी आणि जलसंवर्धनाचे प्रयत्न अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर संबंधित घटकांच्या समन्वित दृष्टिकोनाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करण्यात आले.

सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai