पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

19 नोव्हेंबर रोजी आयोजित केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाशी संबंधित विभागीय शिखर परिषदेच्या समारोप सत्रात पंतप्रधान सहभागी होणार

परिषदेत महत्त्वाच्या चार संकल्पनांवर चर्चा होईल: नशा मुक्त भारत, एक देश,एक शिष्यवृत्ती पोर्टल, लवकर हस्तक्षेप तसेच दिव्यांगत्वाच्या ओझ्यात घट, विकसित भारतासाठी सुगम्य भारत

Posted On: 18 NOV 2026 7:53PM by PIB Mumbai

19 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथील सुषमा स्वराज भवनात दुपारी साडेचार वाजता आयोजित, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाशी संबंधित विभागीय शिखर परिषदेच्या समारोप सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. याप्रसंगी ते बीजभाषण देखील करतील.

18 आणि 19 नोव्हेंबर, 2026 असे दोन दिवस आयोजित या विभागीय शिखर परिषदेमध्ये राजकीय नेते तसेच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण आणि दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणाशी संबंधित क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले राज्यांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. सहकारी संघराज्यवाद बळकट करणे, राष्ट्रीय प्राधान्यक्रमांच्या सामुहिक मालकीला प्रोत्साहन देणे आणि अधिक दृढ केंद्र-राज्य सहयोगातून परिणामांना गती देणे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आयोजित विभागीय शिखर परिषदांच्या साखळीतील ही तिसरी परिषद आहे.

या शिखर परिषदेत खालील चार संकल्पनात्मक क्षेत्रांवर विचारविनिमय होईल:

नशा मुक्त भारत आणि अंमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठीच्या धोरणाची पुनर्कल्पना करणे

एक देश एक शिष्यवृत्ती पोर्टल – सहजगत्या उपलब्ध शिष्यवृत्त्या, सक्षम विद्यार्थी.

लवकर हस्तक्षेप आणि दिव्यांगत्वाच्या ओझ्यात घट

विकसित भारतासाठी सुगम्य भारत

संबंधित अंमलबजावणी विषयक आव्हानांचा सामना करणे आणि प्रशासन तसेच सेवा वितरण यांच्यात सुधारणा करणे यावर अधिक लक्ष केंद्रित करून ही विभागीय शिखर परिषद केंद्र आणि राज्य सरकारांना अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी, सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी आणि महत्त्वाच्या विभागीय प्राधान्यक्रमांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल.

***

Shailesh Patil / Sanjana Chitnis / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2338225) अभ्यागत कक्ष : 8