गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील बिगर-बर्फाच्छादित भागांत जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी स्व-गणनेला सुरुवात

Posted On: 16 NOV 2026 7:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2026

या राज्यांमध्ये आणि भागांमध्ये 1 डिसेंबर 2026 ते 4 जानेवारी 2027 या कालावधीत घरोघरी जाऊन लोकसंख्येची गणना  होईल, त्यानंतर 5 ते 9 जानेवारी 2027 दरम्यान पुनरीक्षण फेरी होणार.

जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील, म्हणजेच लोकसंख्या गणनेच्या स्व-गणना प्रक्रियेला आजपासून गोवा, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये, तसेच उत्तराखंडमधील बिगर-बर्फाच्छादित भागांत सुरुवात झाली आहे. रहिवासी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन सादर करू शकतात.

या राज्यांमध्ये आणि भागांमध्ये 1 डिसेंबर 2026 ते 4 जानेवारी 2027 या कालावधीत घरोघरी जाऊन लोकसंख्येची गणना केली जाईल. त्यानंतर 5 ते 9 जानेवारी 2027 दरम्यान पुनरीक्षण फेरी राबवली जाईल. या राज्यांसाठी आणि भागांसाठी 5 जानेवारी 2027 रोजीची मध्यरात्र, म्हणजेच रात्री 12 वाजताची वेळ संदर्भ वेळ असेल.

जनगणना कायदा-1948 अंतर्गत गोळा करण्यात आलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. या माहितीचा वापर केवळ सांख्यिकीय विश्लेषण आणि विकास नियोजनासाठीच केला जातो. या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमात रहिवाशांनी सक्रिय सहभाग नोंदवावा आणि प्रगणकांना  सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


सुषमा काणे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2337136) अभ्यागत कक्ष : 14