इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

NIELIT तर्फे सायबर सुरक्षा, डिजिटल न्यायवैद्यक आणि बुध्दिमत्ता या विषयांवरील तिसरी राष्ट्रीय परिषद  नवी दिल्ली येथे आयोजित


भारताची सायबर सुरक्षा आणि डिजिटल न्यायवैद्यकीय परिसंस्था मजबूत करण्यासाठी NIELIT- 2026 या क्षेत्रातील प्रमुख भागधारकांना आणणार एकत्र

“सायबर सुरक्षित भारत: भारताचे डिजिटल भविष्य मजबूत करणे” या संकल्पनेअंतर्गत या परिषदेचे होणार आयोजन

Posted On: 15 NOV 2026 11:06AM by PIB Mumbai

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत असलेली राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT), “सायबर सुरक्षित भारत: भारताच्या डिजिटल भविष्याला मजबूत करणे” या संकल्पनेवर आधारित सायबर सुरक्षा, डिजिटल न्यायवैद्यक आणि बुध्दिमत्ता (NCCDFI 2026) या विषयावरील तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन 16-17 नोव्हेंबर 2026 रोजी डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, 15 जनपथ, नवी दिल्ली येथे करत आहे.

.

डिजिटल तंत्रज्ञानावरील वाढते अवलंबित्व, अत्याधुनिक सायबर धोक्यांचा उदय आणि सायबर गुन्हेगारीचे बदलणारे स्वरूप यांमुळे सायबर सुरक्षा आणि डिजिटल तपास ही राष्ट्रीय महत्त्वाची महत्त्वपूर्ण क्षेत्रे बनली असून; सध्याच्या डिजिटल युगात या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.ही परिषद सायबरसुरक्षेच्या विकसित होत असलेल्या क्षेत्राला व्यापणाऱ्या :सायबरसुरक्षा, डिजिटल न्यायवैद्यक, कृत्रिम बुद्धिमत्तेची सुरक्षितता, महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा, थ्रेट इंटेलिजन्स, ब्लॉकचेन आणि क्रिप्टो, ड्रोन आणि आयओटी फॉरेन्सिक्स, डिजिटल पुरावा, सायबर कायदा आणि क्लाउड सुरक्षा अशा दहा प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करेल. उदयोन्मुख धोके, तांत्रिक प्रगती, तपास तंत्र, नियामक घडामोडी आणि सुरक्षित व लवचिक डिजिटल परिसंस्था उभारण्याच्या धोरणांचा शोध घेत सर्व विषयांवर विचारमंथन करण्यासाठी तज्ञ आणि व्यावसायिकांना एकत्र आणतील.

***

शिल्पा पोफळे/संपदा पाटगावकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2336472) अभ्यागत कक्ष : 10