अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या मुंबईतील प्रादेशिक केंद्राच्या वतीने आयोजित संयुक्त क्षमता बांधणी कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालय तसेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT)  यांच्यातील सामंजस्य कराराची अंमलबजावणीला सुरुवात

Posted On: 07 NOV 2026 7:18PM by PIB Mumbai

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या मुंबईतील प्रादेशिक केंद्राच्या वतीने (NADT-RC) 6 नोव्हेंबर 2026 रोजी भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी तसेच प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी व्यवसाय अथवा व्यावसायिक तज्ञतेच्या कार्यक्षेत्रातून मिळणारा नफा आणि लाभ  या विषयावर संयुक्त प्रशिक्षण सत्राचे आयोजन केले होते.

सप्टेंबर 2025 मध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) तसेच भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅग (CAG) कार्यालय यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कराराअंतर्गत परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये शैक्षणिक उपक्रम, प्रशिक्षण, क्षमता बांधणी आणि संशोधनातील परस्पर सहकार्याची तरतूद केली गेली आहे.

या सत्राला मुंबईचे मुंबईचे प्रधान लेखापरीक्षण संचालक (केंद्रीय), यांच्या अंतर्गत कार्यरत 10 सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखापरीक्षण अधिकारी उपस्थित होते. यासोबतच मुंबई आणि पुणे क्षेत्रातील प्राप्तिकर निरीक्षकही या सत्राला उपस्थित होते. या प्रशिक्षण सत्रात व्यवसाय आणि व्यावसायिक उत्पन्नाशी संबंधित मूलभूत तरतुदींचा अंतर्भाव करण्यात आला होता, तसेच प्राप्तिकर कायदा, 1961 आणि प्राप्तिकर कायदा, 2025 अंतर्गत संबंधित तरतुदींच्या तौलनिक विश्लेषणावर विशेष भर देण्यात आला होता.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या मुंबईतील प्रादेशिक केंद्राचे प्रधान अतिरिक्त महासंचालक नवनीत मनोहर यांनी पुढाकाराने मांडलेल्या संकल्पनेतून या विशेष प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली होती.  भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अधिकाऱ्यांमधील तंत्रज्ञानविषयक ज्ञान आणि व्यावसायिक क्षमता वृद्धीच्या अनुषंगाने अकादमीतील तज्ञता आणि प्रशिक्षण पायाभूत सुविधांचा लाभ घेणे, हा या कार्यशाळेच्या आयोजनामागचा उद्देश होता. या उपक्रमाच्या आयोजनाने मुंबई क्षेत्राअंतर्गत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालय यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची प्रत्यक्ष अमलबजावणी करण्याच्या दृष्टीने एक ठोस पाऊल टाकले गेले आहे. यासोबतच संस्थात्मक ज्ञानाच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून कर विषयक मुद्द्यांवर परस्पर आकलन विकसित करण्याच्यादृष्टीनेही ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.

या उपक्रमाच्या आधारे राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या मुंबईतील प्रादेशिक केंद्राच्या वतीने,  भांडवली लाभ करप्रणाली (Capital Gains Taxation), आंतरराष्ट्रीय करप्रणाली आणि ट्रान्सफर प्रायसिंग यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित अधिक विशेष प्रशिक्षणांचे  आयोजन करण्याची योजना आखली जात आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून  शिकण्यासाठीचे तसेच व्यावसायिक क्षमता बांधणीसाठीचे एक शाश्वत व्यासपीठ उपलब्ध होऊ शकणार आहे.

प्राप्तिकर विभागाने क्षमता विकसित करण्यासाठी तसेच क्षमता बांधणीसाठी आखून दिलेल्या आराखड्याची व्याप्ती विस्तारण्याची तसेच सार्वजनिक संस्थांमध्ये व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी योगदान देण्याची राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या मुंबईतील प्रादेशिक केंद्राची वचनबद्धता या उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

व्यवसाय आणि व्यावसायिक उत्पन्नाशी संबंधित तरतुदींवरील तज्ञांचे सत्र.

संयुक्त प्रशिक्षणातील भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालयाचे तसेच प्राप्तिकर विभागाचे सहभागी.

 

***

सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2334044) अभ्यागत कक्ष : 11
Read this releasein: English