लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देशवासीयांना दिल्या दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा

Posted On: 07 NOV 2026 6:32PM by PIB Mumbai

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देशवासीयांना दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

यासंदर्भात ओम बिर्ला यांनी सामायिक केलेला संदेश

आनंदाचा महाउत्सव असलेल्या दिवाळीनिमित्त तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! माझ्या वतीने तुम्हा सगळ्यांना गोवर्धन पूजा आणि भाऊबीजेच्याही हार्दिक शुभेच्छा.

दिवाळी हा केवळ दिवे प्रज्वलित करण्याचा तसंच उत्सव साजरा करण्याचा सण नाही, तर दिवाळी हा इतरांचे आयुष्य आशा, विश्वास आणि आनंदाच्या प्रकाशाने भरून टाकण्याची एक संधी देखील आहे.

ज्याप्रमाणे दिवा स्वतः जळून चहूबाजूला प्रकाश पसरवतो, त्याचप्रमाणे आपणही आपल्या आनंदाने इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न आपल्या आयुष्यात करू या. आपण केवळ आपल्या कुटुंबांच्याच नव्हे, तर अडचणींमुळे सणाच्या आनंदापासून वंचित राहिलेल्यांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलवण्याचा संकल्प करू या. गरजूंची मदत करा, त्यांच्यासोबत आनंद सामायिक करा आणि समाजात प्रेम, सलोखा आणि परस्पर सहकार्याला चालना द्या.

आपल्या आजूबाजूला कोणालाही एकाकी किंवा दुर्लक्षित असल्याचे वाटणार नाही, तेव्हाच आपली दिवाळी खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल.

या पावन प्रसंगानिमित्त देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या आपल्या वीर जवानांना, देशाचे धान्य कोठार भरणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांना, राष्ट्र उभारणीचे काम करणाऱ्या कामगारांना, उद्योजकांना, व्यापाऱ्यांना आणि सर्व देशवासीयांना विशेष शुभेच्छा.

देवी लक्ष्मीच्या कृपेने सर्वांच्या घरात सुख-समृद्धी येवो, शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होवो, युवा वर्गाला नवीन संधी मिळो, व्यापार आणि उद्योगांची प्रगती होवो आणि आपला भारत आर्थिक तसेच सामाजिकदृष्ट्या सातत्याने भक्कम आणि समृद्ध होवो हीच प्रार्थना.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

***

शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2334035) अभ्यागत कक्ष : 10